Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर फर्स्टचा सोमवारी वर्धापनदिन, महापालिकेस करणार स्विपींग मशिन प्रदानगोकुळमध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रम वूमेन इन लीडरशिप कार्यक्रमात उलगडली स्त्रीशक्तीची कर्तबगारी सांगलीत मंत्र्यांनी केले विद्यार्थिनींचे औक्षण, चंद्रकांत पाटलांच्याकडून स्त्रीशक्तीचा सन्मानस्वप्नांना बळ अन् संस्कारी शिक्षण ग्रामीण भागामध्ये देणारा शहीद  पॅटर्न कौतुकास्पद :  राज देशमुखशिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर, २९ मार्चला पुरस्कार वितरणगोकुळकडून महिला दूध उत्पादकांसाठी नारी सन्मान विमा योजना खासगी प्राथमिकतर्फे मालवणमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी चौदावा दीक्षांत समारंभ

जाहिरात

 

सांगलीत मंत्र्यांनी केले विद्यार्थिनींचे औक्षण, चंद्रकांत पाटलांच्याकडून स्त्रीशक्तीचा सन्मान

schedule08 Mar 26 person by visibility 74 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,: औक्षण करण्याची परंपरा बहुतेक वेळा महिलांकडूनच पार पाडली जाते. परंतु, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा रूढ पायंडाच बदलत चक्क स्वतः विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचा सन्मान केला. या हृदयस्पर्शी क्षणामुळे उपस्थितांच्या मनात आदर आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

निमित्त होते लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेतन, सांगली व शासकीय तंत्रनिकेतन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नारीशक्ती संवाद कार्यक्रमाचे. राज्य शासन महिला सबलीकरणासाठी कटिबद्ध आहे, हे सांगताना त्याची प्रचिती पालकमंत्री पाटील यांच्या या छोट्याशा कृतीतून दिसून आली. या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री यांच्या पत्नी अंजली पाटील, लठ्ठे एज्युकेशन संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिलचे राजीव पाटील, अध्यक्ष शांतिनाथ कांते, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विश्वस्त समितीचे अध्यक्ष वास्तुविशारद प्रमोद चौगुले, मानद सचिव सुहास पाटील, खजिनदार भालचंद्र पाटील, शासकीय तंत्रनिकेतन, मिरजचे प्राचार्य डॉ. संजय परदेशी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य अण्णासाहेब गाजी, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुलींशी संवाद साधायचा, या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच संकल्पनेतून हा कार्यक्रम आकारास आला. यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वडीलकीच्या नात्याने त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. छोट्या-छोट्या उदाहरणांमधून त्यांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व सांगत मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. महिलांचे औक्षण करण्याचा नवीन पायंडा आपण सुरू केला असल्याचे अभिमानाने सांगून पालकमंत्री  पाटील यांनी राज्य सरकारने महिला व विशेषतः विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी तसेच, त्यांच्या उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती सांगितली. विद्यार्थिंनींचे औक्षण केल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी त्यांना मिठाई भेट दिली. या अनोख्या कृतीमुळे उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. ही कृती केवळ प्रतीकात्मक नसून महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या सामर्थ्याचा भावनिक स्वीकार असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. प्रभारी प्राचार्य अण्णासाहेब गाजी यांनी संस्थेचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याचे सांगून विविध उपक्रमांचा आढावा घेतला. आभार डॉ. मगर यांनी मानले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes