उद्योगपती माधवराव घाटगे यांना ‘सॅटर्डे क्लब’चा उद्योगरत्न पुरस्कार, शुक्रवारी पुरस्कार वितरण
schedule18 Aug 21 person by visibility 228 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक माधवराव घाटगे यांना सॅटर्डे क्लबचा ‘उद्योगरत्न पुरस्कार’जाहीर झाला आहे. शुक्रवारी (ता. २० ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता रोटरी समाज सेवा केंद्र येथे पुरस्कार वितरण सोहळा आहे. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.
संजय घोडावत ग्रुपचे संस्थापक संजय घोडावत हे याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत. सॅटर्डे क्लबचे चेअरमन अशोक दुगाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. क्लबचे जनरल सेक्रेटरी प्रदीप मांजरेकर, हर्षवर्धन भुर्के आदींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे.
सॅटर्डे क्लबचे २५०० हून अधिक सभासद आहेत. यामध्ये उद्योजक, व्यावसायिकांचा समावेश आहे. स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या संकल्पनेतून सॅटर्डे क्लबची स्थापना झाली. या संस्थेच्या राज्यभरात ६९ चॅप्टर्स आहेत. रिजनल हेड विशाल मंडलिक यांनी यासंबंधीची माहिती देताना म्हणाले, ‘उद्योगरत्न पुरस्काराची निवड कोल्हापुरातील प्रमुख उद्योजक, व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कमिटीमार्फत होते.’ पत्रकार परिषदेला योगेश देशपांडे, महेश पाटील, शैलेश देशपांडे आदी उपस्थित होते.