बिद्री कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी जीवन पाटील
schedule17 Jul 25 person by visibility 49 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील यांची दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. कारखान्याच्या प्रधान कार्यालयात बैठक आयोजित केली होती.
बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत जीवन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान नेते मंडळीच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी उमेदवारी मागे घेतली. सत्तारुढ आघाडीला पाठिंबाही दिला. निवडणुकीच्या कालावधीत नेत्यांनी, पाटील यांना स्वीकृत संचालकपदाचा शब्द दिला होता. कारखान्याच्या संचालकांची बुधवारी (१६ जुलै) बैठक झाली. याप्रसंगी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी बंद पाकिटातून नाव पाठविले. गोकुळचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांच्यामार्फत बंद पाकिटातून स्वीकृत संचालकपदासाठी जीवन पाटील यांचे नाव पाठविले. संचालक मंडळाच्या बैठकीत पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह संचालक उपस्थित होते.
…………………………………..
‘बिद्री कारखान्यात संचालक म्हणून यापूर्वी काम केले आहे. आमचे नेते आमदार सतेज पाटील यांनी बिद्री कारखान्याच्या संचालकपदी पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार उत्कृष्टरित्या चालू आहे. त्यांना साथ देताना पदाला साजेसे काम करुन निवड सार्थ ठरवू. ’
- जीवन पाटील, संचालक बिद्री साखर कारखाना