Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एआयची साथ मिळाल्याने उपचार पद्धतीत अचूकता- संभाव्य धोके ओळखण्याची क्षमता वाढली सर, तुम्ही सुद्धा...!निवडणुकीपूर्वी ठरावधारकांची सहल, निकालानंतर संचालकांची टूर ! दोन्ही आघाडयांकडून नियोजन !!इकोबाजार, पर्यावरणपूरक उत्पादनांचे प्रदर्शनमतदानाचा टक्का वाढला ! शिक्षकसाठी ८५.८७ टक्के, पदवीधरसाठी ६२.७८ टक्के !! नवीन आमदार कोण ?सायबर महाविद्यालयात यंदा किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलशिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात डीवाय पाटील अभियांत्रिकीचे विद्यार्थी चमकले पोलंडचे पंतप्रधान लवकरच कोल्हापूरला भेट देणार, युवराज संभाजीराजेंच्यासमोर केली ईच्छा व्यक्तकोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडेवालावलकर हायस्कूलची रिले स्पर्धेत चमक,  विभागीय स्पर्धेसाठी निवड

जाहिरात

 

सायबर महाविद्यालयात यंदा किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल

schedule23 Oct 26 person by visibility 98 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर पर्यावरणावर आधारित किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल २७ व २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सायबर महाविद्यालयात होत आहे. अशी माहिती किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी उपक्रम अधिकारी शरद आजगेकर, लक्ष्मी फाऊंडेशनचे विनायक देसाई आणि सायबरमधील प्रा. डॉ. दीपक भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दोन दिवसीय महोत्सवात पर्यावरणावर आधारित विविध लघुपटांचे सादरीकरण होणार आहे.

कोल्हापुरातील उद्योजिका श्रीमती मोनिका मोहिते, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीचे साईट लीडर सुरेश मगदूम, किर्लोस्करमधील एचआर प्रमुख हरिष सायवे, सायबरचे संचालक डॉ. आर. के. टेलर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवाच्या अनुषंगाने सायबर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य, फोटोग्राफी, काव्य लेखन स्पर्धा होणार आहेत. महोत्सवात डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. शिंपी शर्मा यांचे मार्गदर्शन तसेच तेजस झगडे, चिदंबर शिंदेव सागर चौगुले यांचे पर्यावरणीय प्रात्यक्षिक सादरीकरण होणार आहे. या महोत्सवात माण तालुक्यातील रोहित आणि रक्षिता बनसोडे, योगेश फोंडे यांचे पर्यावरणीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश शर्मा यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल.

……………………

दिवाळीनंतर पाच महाविद्यालयात वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल

दिवाळीनंतर डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कॉलेज, न्यू कॉलेज, भोगावती कॉलेज अशा पाच ठिकाणी वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे. तसेच पाच शाळांमध्येही विद्यार्थ्यांना या फेस्टिव्हल अंतर्गत पर्यावरणाशी निगडीत फिल्म दाखविण्यात येणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes