कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडे
schedule23 Oct 26 person by visibility 58 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल अशोक नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत मल्लाप्पाणा नासिपुडे तर सचिवपदी सुनिल शशिकांत गाताडे यांची निवड झाली. समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक नानासाहेब नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०२६ -२७ या वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळात नानासाहेब नष्टे, मनोहर गाडवे, राजेश पाटील चंदूरकर, सुहास भेंडे, राजशेखर वाली, अॅड.सतीश खोतलांडे, चंद्रकांत हळदे, कुमार हिरेमठ, किरण गवळी, संजय बोधले, राजेंद्र करंबळी, प्रशांत करंबळी, धर्मेंद्र नष्टे, गणेश सन्नकी, अविनाश नासिपुडे, केतन तवटे, सत्यजीत सांगावकर, गुरुदेव स्वामी आणि व्यवस्थापकपदी बी. एस पाटील यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष किरण गवळी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.‘’ज्येष्ठांचे मार्गदर्शन व संचालक मंडळाला सोबत घेऊन समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणार आहोत.’असे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.