इकोबाजार, पर्यावरणपूरक उत्पादनांचे प्रदर्शन
schedule24 Oct 26 person by visibility 65 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशनच्यावतीने इकोबाजार प्रदर्शन आयोजित केले आहे. श्रीराम पोतनीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनामध्ये सेंद्रिय भाजीपाला, भाजीपाला रोपे, शेतमाल, धान्य, रानभाज्या तसेच विविध पर्यावरणपूरक उत्पादनांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.या उद्घाटन समारंभास किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे सीएसआर अधिकारी शरद अजगेकर, कंटेंट क्रिएटर पार्थ वणकुद्रे, दीपक भोसले, दिलीप माळी उपस्थित होते.ग्रामीण महिला उद्योजिकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होत असून, नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक उत्पादनांविषयी जागरूकताही निर्माण होत आहे. हे प्रदर्शन २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत, दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत, स्वयंसिद्धा, साईक्स एक्स्टेंशन, कोल्हापूर येथे सुरू राहणार आहे.