Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कारकरवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्राकाँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलनकोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !

जाहिरात

 

महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ  नाही - सत्ताधारी नगरसेवकांची व्यावसायिकांना ग्वाही

schedule13 Mar 26 person by visibility 157 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या २०२६-२७ चे अंदाजपत्रक लवकरच सादर होत असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करु नये असे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना दिले. शिवसेनेचे गटतेने नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांनी बैठक घडवून आणली. यावेळी गटनेते देशमुख व नगरसेवक क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकांत कोणतीही व्यावसायिक वाढ होऊ देणार नाही अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

यावेळी बोलताना चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी म्हणाले, कोल्हापूर महापालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांच्या भाडे प्रश्नांसंबंधी२०१५ पासून वाद सुरु आहे. महापालिकेच्या भाडे व ठेव निर्धारण समितीने २०१९ पुढील भाडे निश्चित केले होते. भाडे एकरकमी भरल्यास त्यावर जे दंड व व्याज येईल त्यावर अभय योजना लागू करुन देण्यात आली होती.  त्या अनुषंगाने उपस्थित प्रश्नावर बोलताना नगरसेवक देशमुख यांनी गाळेधारकांसाठी पुन्हा अभय योजना आणणेसाठी आपण प्रयत्नशील आहे असे सांगितले. यावेळी आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कायद्याने दोनवेळा अभय योजना देता येते का याची माहिती घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले. ज्या गाळेधारकांनी  २०१९ पुढील भाडे अजूनही भरलेले नाही त्यांची यादी कोल्हापूर चेंबरकडे द्यावी व ज्यांनी भाडे भरले आहे त्यांना एनओसी द्यावी असेही अजित कोठारी यांनी सांगितले. 

अमर क्षीरसागर यांनी जीएसटी जुलै २०१७ मध्ये लागू झाला असताना सन २०१५ ते २०१७ मधील थकीत गाळेधारकांना जीएसटी च्या नोटीसा महापालिकेने काढल्या आहेत. नोटीसा दुरुस्त करुन देण्याची मागणी त्यांनी केली.  खुल्या व विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नांकडे किशोर वाटवे यांनी लक्ष वेधले. तर सील केलेले गाळे चालू करुन देण्याची मागणी ॠतुराज क्षीरसागर व देशमुख यांनी आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना केली. आमदार अमल महाडिक व आमदार राजेश क्षीरसागर याबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडणार असून तोवर कारवाई थांबविण्यात यावी असे ॠतुराज क्षीरसागर यांनी सांगितले. अजित कोठारी यांनी २०२३-२४ मध्ये महापालिकेने परवानाधारकांना सवलत योजना लागू केल्याचे निदर्शनास आणून देत यावर्षी देखील अभय योजना लागू करावी असे सांगितले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स संचालक संपत पाटील राहुल नष्टे, अविनाश नाशिपुडे, संदीप वीर, आदी उपस्थित होते 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes