Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कारकरवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्राकाँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलनकोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !

जाहिरात

 

कोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने

schedule16 Mar 26 person by visibility 38 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय  अर्थसंकल्पीय बजेट सुरू असताना   काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व काँग्रेसच्या खासदारांनी संसदेतील मकर प्रवेशद्वारा जवळ चहा बिस्किट सोबत चाय पार्टी आयोजित केली. ही अत्यंत खेदजनक आणि आक्षेपार्य बाब आहे. या घडलेल्या कृत्याचा भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला. राहुल गांधींचा धिक्कार असो, काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. 
‘संसद का अपमान नही सहेगा हिंदुस्तान, संसद के सन्मान मे भाजपा मैदान मे’असे फलक कार्यकर्त्यांच्या हाती होते. याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सत्तर वर्षांमध्ये जेवढे काय लोकप्रतिनिधी खासदार म्हणून मंत्री म्हणून निवडून गेले हे या सभागृहाला मंदिर मानतात कारण या देशातल्या १४४ करोड लोकांचे प्रश्न, समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांना न्याय देणे, त्यांना आधार देणे त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याची कामे दिल्लीच्या या सभागृहामध्ये होत असतात परंतु दोन दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी एक विचित्र चित्र पाहिले म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी व अन्य खासदारांनी या संस्थेला पिकनिक स्पॉट सारखे दृश्य देण्याचे काम केले. त्याचा आम्ही निषेध करतो.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक,अशोक देसाई, राजसिंह शेळके, विशाल शिराळे, हेमंत आराध्ये, माधुरी नकाते, रेखा उगवे, विजय अग्रवाल,किरण नकाते, सयाजी आळवेकर, विश्वजीत पवार रवी पाटील  दिग्विजय कालेकर, नितीन पोवार, उमा पोवार, धीरज पाटील, सुनील पाटील, प्रीतम यादव, प्रशांत अवघडे, थला मनेर, भरत काळे, प्रसाद नरुले, गिरीश साळुंखे, बबलू फाले, संभाजी शिंदे, किरण सुतार, रवींद्र घाटगे, राजेंद्र जाधव, प्रकाश घाटगे, अनिल कोळेकर, जनार्दन पोवार, राकेश गुंदेशा, संग्राम पाटील, संग्रामसिंह निकम, अमोल पालोजी, दीपक काटकर, ओंकार गोसावी, भूषण कानकेकर, सुधीर राणे, सचिन पोवार, किरण कुलकर्णी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes