Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आनंददायी शनिवारमध्ये विद्यार्थी गिरवणार राष्ट्रभक्ती- शिस्त-नेतृत्वगुणाचे धडे, माजी सैनिक देणार प्रशिक्षण !  शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या; इंडिया आघाडीची मागणीवळसंगकरांचे ग्रामपंचायत इमारतीचे स्वप्न साकारले ! गुरुवारी उदघाटन समारंभ !! अजिंक्यतारा कार्यालयात संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटपकळंबा ग्रामपंचायतीला उशिरा सुचलेले शहाणपण, तलाव वाचविण्यासाठी हवी कठोर भूमिकातब्बल तीस वर्षांनी रंगला विटा हायस्कूलच्या 1996 च्या बॅचचा स्नेहमेळावा कोजिमाशिच्या चेअरमनपदी सचिन शिंदे, व्हाइस चेअरमनपदी ऋतुजा पाटील गांधी मैदानाच्या पाणी निचरा मार्गात जाणूनबुजून अडथळा-शिवसेना शिष्टमंडळाचे पोलिसात निवेदनवरिष्ठ - निवड श्रेणी प्रशिक्षण पुढे ढकला - राजेंद्र कोरेसातारा - कागल महामार्गाचे काम संथगतीने, कंत्राटदाराला नोटीस

जाहिरात

 

तब्बल तीस वर्षांनी रंगला विटा हायस्कूलच्या 1996 च्या बॅचचा स्नेहमेळावा

schedule27 May 25 person by visibility 243 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :घंटेचा गजर… सर्व जण रांगेत उभे.. परेड विश्राम… परेड सावधान…, एक साथ प्रार्थना शुरू कर… एकसुरात सर्वात्मका शिवसुंदरा प्रार्थना पठण. पण ठिकाण कुठलीही शाळा नव्हती. तर होते विट्यातील हॉटेल इस्टीन इन. निमित्त होतं, रयत शिक्षण संस्थेच्या विटा हायस्कूल, विटाच्या  1995-96  या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा. सेवानिवृत्त गुरूजन आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मिळून जवळपास 70 जणांनी  पुन्हा एकदा  शालेय अनुभव घेतला.

सेवानिवृत्त शिक्षक पी. एन. कुंभार, एच. के. जाधव, यु. एन. पवार आणि थोरात सर तसेच श्रीमती एम. एम. पवार आणि श्रीमती महाजन  या तत्कालिन शिक्षकांनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थिती लावली आणि विद्यार्थ्यांची हजेरीही घेतली. ‘अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती’ म्हणत कानपिचक्या घेत, मौलिक सल्ले देत अनुभवाचेही बोल विषद केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत आरोग्य जपा, असे सांगत भरभरुन आशीर्वादही दिले. वयाच्या पंचेचाळिशीतील मंडळींनीही हे धडे विद्यार्थ्यांप्रमाणेच आत्मसात केले.

दिवसभर हास्य विनोदात परस्परांची विचारपूस करत दोस्ती आणि दुनियादारीचे गप्पाष्टक रंगले. कुणी भावनिक क्षण टिपले. शाळेतील खोड्या, गंमती-जंमती, गृहपाठ, पीटीचा तास, खाल्लेला मार…. प्रत्येकाचं मन 30 वर्षांपूर्वीच्या भूतकाळात गेलं. अगदी शालेय जीवन पुन्हा अनुभवायचं असंच कार्यक्रमाचं स्वरूप आखलं गेलं. शिक्षकांचे पुष्पपाकळ्यांनी स्वागत तर विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. ईशस्तवन, स्वागतगीत, दीपप्रज्वलन, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. ती-तो सध्या काय करते-करतो याची देवाणघेवाण झाली. शिक्षकांचे मार्गदर्शन झाले. कलागुणांचे सादरीकरणही करण्यात आले.

दिवसभर शालेय जीवनातील आठवणींना उजाळा, स्नेहभोजन आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता.. प्रत्येकाने हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासाठी या आठवणी बांधून घेतल्या आणि ही आठवण चित्रबद्ध केलेली फोटो फ्रेमही.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes