Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राचार्य डॉ. मानसिंगराव जगताप यांचे  निधनशिवाजी विद्यापीठाकडे पूर्ण वेळ कुलगुरू नियुक्ती करावी; शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा .सुनील शिंत्रे आमदार शिवाजीराव पाटलांच्या उमेदवारांना गोकुळमध्ये आमची लोक मते देतील याची खाञी नाही – हसन मुश्रीफांचा पलटवारवारणा शिक्षण मंडळास पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता; पुणे विभागातील पहिले खासगी महाविद्यालयबार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. राजेंद्र मंडलिक पॅनेलची बाजी, अॅड. प्रशांत चिटणीस पराभूतकोल्हापूर जिल्ह्यातील बारा पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटीलविवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणी

जाहिरात

 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफ

schedule30 Apr 26 person by visibility 423 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असे स्पष्टीकरण दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. दरम्यान; श्री. महादेव सहकारी दूध संस्थेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे

           
या पत्रकात मुश्रीफ यांनी पुढे म्हंटले आहे, अंतरीम अवसायानातील ,१०८ दूध संस्थांपैकी काही दूध संस्थांच्या सुनावण्या पूर्ण होऊन त्यांचे निकालही दिलेले आहेत. अंतरीम अवसायानातील उर्वरित दूध संस्थांच्या  सुनावणीची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या शपथपत्राच्या अनुषंगाने ७० ते ७५ दिवसात पूर्ण करून तात्काळ निवडणूक कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले आहेत
      

या पत्रकात मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या ,१०८  संस्थांनी दूध संघाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी म्हणून याचिका दाखल केली होती. आज त्याची सुनावणी होऊन मा. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. या आदेशात पुढे म्हटले आहे की, या ,१०८ दूध संस्थांचा मतदानाचा हक्क डावलू नये म्हणून नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार त्यांना संधी देण्यात यावी. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर कायद्यातील तरतूदीनुसार निवडणूक कार्यक्रम चालू करण्यात यावा.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes