कोल्हापूर जिल्ह्यातील बारा पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह
schedule01 May 26 person by visibility 29 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलालील पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळून बारा जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले. पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल या सन्मानचिन्हांनी गौरविण्यात येते.राज्यातील ८५० जणांना हे पदक जाहीर झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील पदक प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये राजारामपुरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार तानाजी चौगुले, दहशतवाद विरोधी पथकातील शेखर सवतेकर, वंदना भोईटे, शहर वाहतूक शाखेचे सहायक फौजदार राजेश पाटील, पासपोर्ट विभागाचे हवालदार दीपक ढंग, स्थानिक गुन्हे शाखेचे वसंत पिंगळे, अमरसिंह वासुदेव, सतीश जंगम, रामचंद्र कोळी, स्वप्नील साळवी, संदीप म्हसवेकर, शाहुपुरीचे अंमलदार कृष्णा पाटील यांचा समावेश आहे.