Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रविकिरण इंगवलेंचे आमदारपुत्रावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचाही पलटवारनवीन आयकर कायदा चार्टर्ड अकौंटंटसनी सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावा - सीए मंगेश किनारेडॉ. जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी  शाहू पुरस्कार जाहीरडीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ वाशिंग्टन ॲकॉर्ड मानांकनसतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा रविवारी , प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टरलिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर ! शंकरराव माळींना समाजरत्न, कांता माळींना आदर्श माता पुरस्कार ! !राजू मानेंचे प्रशासनाला शहर विकास प्रकल्पासंबंधीचे निवेदनगंगावेश तालमीचे रखडलेले काम मार्गी लावू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महाराष्ट्र कस्ती संघटनेला ग्वाहीसरकारी कमिटीला सरकारच्याच आदेशाचा विसर !  पूररेषेच्या सर्व्हेक्षणाची मुदत उलटूनही समितीची ना बैठक…ना पाहणी, अहवाल तर लांबच ! !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजामुळे हजारो सभासद मतदानापासून वंचित, चित्रपट महामंडळात परिवर्तन गरजेचे

जाहिरात

 

नवीन आयकर कायदा चार्टर्ड अकौंटंटसनी सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावा - सीए मंगेश किनारे

schedule04 Jun 26 person by visibility 51 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : ‘नवीन आयकर कायदा लागू झाल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिकांनी या कायद्याचा सखोल अभ्यास  करावा. आयकरविषयक नवीन कायदा चार्टर्ड अकाउंटंट्सनी सोप्या भाषेत सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवला पाहिजे.’ असे मत आयसीएआयचे उपाध्यक्ष सीए मंगेश किनारे यांनी व्यक्त केले.

आयसीएआयच्या कोल्हापूर शाखेतर्फे ‘आयकर कायदा 2.0’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आनंद भवन, सायबर येथे आयोजन केले होते. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन आयसीएआयचे उपाध्यक्ष सीए  किनारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए निहार जंबुसरिया, आयसीएआय केंद्रीय समिती सदस्य सीए पियुष छाजेड, आयसीएआय पश्चिम महाराष्ट्र विभागीय समितीचे सीए मंगेश घाणेकर, सीए संजय निकम, सीए अभिषेक धामणे आणि पियुष चांडक आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना किनारे यांनी आपल्या वाटचालीत कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या शाखांतील सर्व चार्टर्ड अकाउंटंट्सचा पाठिंबा मोलाचा ठरल्याचे नमूद केले. ‘सध्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्भवणाऱ्या कर व वित्तीय विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आयसीएआयतर्फे निश्चितच प्रयत्न केले जातील ’असे स्पष्ट केले. कोल्हापूर शाखेचे चेअरमन आशिष सेवेकरी म्हणाले, ‘आयकर कायदामध्ये ६३ वर्षांनंतर त्यामध्ये सुधारणा नव्हे, तर तो पुन्हा लिहिला गेला आहे. नवीन भाषा, नवीन रचना, नवीन तरतुदी आहेत व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटसाठी, हा केवळ एक कायदेशीर बदल नाही — तर ही एक व्यावसायिक पुनर्रचना आहे. आपले ग्राहक आपल्याकडे पाहतील.  नवीन आयकर कायदा सर्वांसाठी शिकण्याची गरज असून, या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून त्या अभ्यासाची प्रभावी सुरुवात झाली आहे.’.

कोल्हापूर शाखेतर्फे उपाध्यक्ष सीए आलोक शाह, सचिव सीए राघवेंद्र बकरे, खजिनदार सीए निखिल देवणे, विद्यार्थी शाखा प्रमुख सीए प्रीती पाचोरे तसेच शाखेचे माजी अध्यक्ष सीए नितीन हरगुडे यांची उपस्थिती लाभली. ही परिषद यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक  स्वप्निल सादळे, प्रज्वल चौगुले व अमोल वाळवेकर यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes