Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रविकिरण इंगवलेंचे आमदारपुत्रावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचाही पलटवारनवीन आयकर कायदा चार्टर्ड अकौंटंटसनी सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावा - सीए मंगेश किनारेडॉ. जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी  शाहू पुरस्कार जाहीरडीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ वाशिंग्टन ॲकॉर्ड मानांकनसतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा रविवारी , प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टरलिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर ! शंकरराव माळींना समाजरत्न, कांता माळींना आदर्श माता पुरस्कार ! !राजू मानेंचे प्रशासनाला शहर विकास प्रकल्पासंबंधीचे निवेदनगंगावेश तालमीचे रखडलेले काम मार्गी लावू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महाराष्ट्र कस्ती संघटनेला ग्वाहीसरकारी कमिटीला सरकारच्याच आदेशाचा विसर !  पूररेषेच्या सर्व्हेक्षणाची मुदत उलटूनही समितीची ना बैठक…ना पाहणी, अहवाल तर लांबच ! !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजामुळे हजारो सभासद मतदानापासून वंचित, चित्रपट महामंडळात परिवर्तन गरजेचे

जाहिरात

 

डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ वाशिंग्टन ॲकॉर्ड मानांकन

schedule04 Jun 26 person by visibility 50 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळाचे (एनबीए) टीएर-१ (वॉशिंग्टन ॲकॉर्ड) हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाल्याची माहिती डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.

हॉटेल सयाजी येथे आयोजित विशेष समारंभात डॉ. पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र-कुलपती व संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त सौ. पूजा ऋतूराज पाटील, कार्यकारी संचालक व डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, एन बी. ए. समन्वयक डॉ. गणेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

केमिकल इंजिनिअरिंग,  सिव्हील इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि मॅकेनिकल इंजिनिअरिंग या पाच अभ्यासक्रमांना हे मानांकन मिळाले आहे. शैक्षणिक गुणवत्ता, परिणामाधारित शिक्षण, संशोधन, उद्योग-संलग्नता, प्रयोगशाळा सुविधा आणि विद्यार्थ्यांची प्रगती यांचे सखोल मूल्यमापन केल्यानंतर हे मानांकन प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

ऋतुराज पाटील म्हणाले,  या मानांकनामुळे विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. उद्योग, संशोधन आणि नवोपक्रम यांचा संगम घडवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रयत्नशील आहे. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, आजी- माजी विद्यार्थी आणि व्यवस्थापनाच्या संयुक्त प्रयत्नांचे हे यश आहे. 

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, भारत वॉशिंग्टन अकॉर्डचा सदस्य असल्याने या अभ्यासक्रमांना २6 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. प्राचार्य डॉ. संतोष चेडे म्हणाले, हे मानांकन संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि परिणामाधारित शिक्षण व्यवस्थेवरील राष्ट्रीय विश्वासाचे प्रतीक आहे.

यावेळी डॉ. गणेश पाटील, सिव्हील विभागप्रमुख किरण माने, केमिकल विभागप्रमुख डॉ. के. टी.  जाधव, कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख डॉ. राधिका ढणाल, इलेक्ट्रोनिक्स अड टेलीकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. टी. बी. मोहिते पाटील, पोलीटेक्निक्चे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त केले.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शिंदे व प्रा. मधुगंधा मिठारी यांनी केले तर आभार डॉ. एल. व्ही.  मालदे यांनी मानले. यावेळी शिवाजी विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ ए. एन जाधव, डी. वाय. पाटील ग्रुपच्या सी.एच. आर. ओ. श्रीलेखा साटम उपस्थित होते.


 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes