Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रविकिरण इंगवलेंचे आमदारपुत्रावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचाही पलटवारनवीन आयकर कायदा चार्टर्ड अकौंटंटसनी सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावा - सीए मंगेश किनारेडॉ. जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी  शाहू पुरस्कार जाहीरडीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ वाशिंग्टन ॲकॉर्ड मानांकनसतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा रविवारी , प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टरलिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर ! शंकरराव माळींना समाजरत्न, कांता माळींना आदर्श माता पुरस्कार ! !राजू मानेंचे प्रशासनाला शहर विकास प्रकल्पासंबंधीचे निवेदनगंगावेश तालमीचे रखडलेले काम मार्गी लावू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महाराष्ट्र कस्ती संघटनेला ग्वाहीसरकारी कमिटीला सरकारच्याच आदेशाचा विसर !  पूररेषेच्या सर्व्हेक्षणाची मुदत उलटूनही समितीची ना बैठक…ना पाहणी, अहवाल तर लांबच ! !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजामुळे हजारो सभासद मतदानापासून वंचित, चित्रपट महामंडळात परिवर्तन गरजेचे

जाहिरात

 

डॉ. जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी  शाहू पुरस्कार जाहीर

schedule04 Jun 26 person by visibility 122 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राजर्षी  शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टमार्फत दिला जाणारा मानाचा राजर्षी  शाहू पुरस्कार यंदा दिवंगत इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना जाहीर झाला आहे.  येत्या शाहू जयंतीदिनी अर्थात 26 जून 2026 रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यंदाचा पुरस्कार हा चाळीसावा आहे. 1984 पासून शाहू पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे. डॉ. जयसिंगराव  पवार यांची ओळखी महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि व्यासंगी इतिहास संशोधक म्हणून होती. त्यांनी मराठेशाहीचा इतिहास आणि  शाहू महाराजांच्या विचार जगभरात पोहोचवण्याचे आयुष्यभर मोलाचे कार्य केले. डॉ. पवार यांनी मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी 40 पेक्षा जास्त इतिहास ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांनी संपादित केलेला बाराशे पानांचा  शाहू स्मारक ग्रंथ इतिहास संशोधनातील मैलाचा दगड मानला जातो. त्यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून  शाहूंचे चरित्र मराठी आणि परकीय भाषांमध्ये भाषांतरित झाले. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या  शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. पवार यांनी मराठ्यांचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्र या विषयावर 40 पेक्षा जास्त पुस्तके  लिहिली आहेत. पत्रकार परिषदेला आयुक्त राजेंद्र भारूड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव,  ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes