Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी टीडीआरचा वापर, आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठकगोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवारजनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष रामुगडेशहीद महाविद्यालयातील गोपिकांचा जल्लोष, डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडीटीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, विवेकानंद संस्थेतर्फे रविवारी पुरस्कार वितरण समारंभविधी परीक्षेत धन्वंतरी पाटील शिवाजी विद्यापीठात प्रथमयुवा स्पोर्ट्स, गारगोटी मंडळाच्या गणेशमुर्तीचे थाटात आगमणगणेशोत्सव... माय मराठीचा गजर अन पुस्तकाची निर्मिती ! छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची बातच न्यारी !!गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल ! मुख्यमंत्री मार्ग काढतील !! - मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

गोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवार

schedule12 Sep 26 person by visibility 83 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सर्किट बेंच व विभागीय उपनिबंधक यांनी अवसायनातील 492 संस्था पात्र ठरविल्या होत्या. या संस्थांचा गोकुळच्या अंतिम मतदार यादीत समावेशही झाला. या निर्णयाविरोधात आता इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संस्थेच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील यांनी पात्र दूध संस्थांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्याची तयारी केली आहे. संस्थांच्या वतीने ॲड. आनंद लांडगे बाजू मांडणार आहेत. आत्ता गोकुळचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारपासून (पंधरा सप्टेंबर २०२६) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे.

गोकुळची निवडणूक प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या विविध न्यायालयीन सुनावणीमुळे चर्चेत आली आहे. याच दरम्यान इस्पुर्ली येथील श्री राम दूध संस्थेचे सदस्य रजनीकांत चेंडके यांनी महाराष्ट्र शासन आणि अन्य संबंधित विभागाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे अवसयानातील सुमारे 492 संस्था पुन्हा न्यायालयीन कचाट्यात सापडल्या आहेत. मात्र या दूध संस्थांचे अंतिम मतदार यादीतील स्थान कायम ठेवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी देखील पात्र संस्थांना पाठबळ देत सर्वोच्च न्यायालयात संस्थांच्या वतीने वकील देऊन बाजू मांडणार आहेत. या याचिकेची सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून मंगळवारी सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes