Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी टीडीआरचा वापर, आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठकगोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवारजनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष रामुगडेशहीद महाविद्यालयातील गोपिकांचा जल्लोष, डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडीटीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, विवेकानंद संस्थेतर्फे रविवारी पुरस्कार वितरण समारंभविधी परीक्षेत धन्वंतरी पाटील शिवाजी विद्यापीठात प्रथमयुवा स्पोर्ट्स, गारगोटी मंडळाच्या गणेशमुर्तीचे थाटात आगमणगणेशोत्सव... माय मराठीचा गजर अन पुस्तकाची निर्मिती ! छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची बातच न्यारी !!गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल ! मुख्यमंत्री मार्ग काढतील !! - मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

विधी परीक्षेत धन्वंतरी पाटील शिवाजी विद्यापीठात प्रथम

schedule12 Sep 26 person by visibility 93 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :येथील शहाजी लॉ कॉलेजची विद्यार्थिनी व माजी नगरसेवक शशिकांत धोंडीराम पाटील यांची कन्या धन्वंतरी पाटील यांनी पाच वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकाविला.प्राचार्य डॉ. प्रविण पाटील, डॉ. सविता रासम, डॉ. मौला शेख, डॉ. सुचिता सुरधीहल्ली, डॉ. अस्मिता पाटील, आई, ज्योत्स्ना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल धन्वंतरी पाटील विविध पारितोषिकांची मानकरी ठरली आहे. यामध्ये  प्रिन्सिपल अॅड. नानासाहेब नांद्रेकर प्राईज, सांगली येथील अॅड. दत्तात्रय नारायण कुलकर्णी स्मृती पुरस्कार, नारायणदास सर्वोत्तमदास सोटी स्मृती पारितोषिक व अॅड. अरविंद सी शहा स्मृती पारितोषिक, न्यू पॅलेस सेवा सोसायटी पारितोषिकांचा समावेश आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes