Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !करवीर-हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : आमदार अमल महाडिकआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिकबेकायदेशीर गर्भलिंग चाचणी - गर्भपात करणाऱ्या एसपी गॅंगच्या 11 जणांवर मोक्का, राज्यातील पहिलीच कारवाईएसएनडीटी विभागीय युवा महोत्सव गाजविला शहीद वीरपत्नीच्या विद्यार्थिनींनी ! सोळा पदकांची कमाई !!शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर पुरस्कार प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना जाहीरबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकर

जाहिरात

 

एसएनडीटी विभागीय युवा महोत्सव गाजविला शहीद वीरपत्नीच्या विद्यार्थिनींनी ! सोळा पदकांची कमाई !!

schedule25 Aug 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : एसएनडीटी महिला विद्यापीठाच्यावतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय युवा महोत्सवात शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवेच्या विद्यार्थिनींनी पंधरा कलाप्रकारांत सोळा पदकांची कमाई  केली. महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

नाट्य विभागात एकांकिका व पथनाट्याने द्वितीय क्रमांक, मूकनाट्य व स्किटने तृतीय क्रमांक, तर मिमिक्रीने प्रथम क्रमांक पटकावला. नृत्य विभागात लोकनृत्याने तृतीय आणि क्रिएटिव्ह डान्सने द्वितीय क्रमांक मिळवला.

साहित्य विभागात विद्यार्थ्यांनी विशेष चमक दाखवत हिंदी वक्तृत्वात प्रथम क्रमांक, इंग्रजी वक्तृत्व आणि वादविवादात तृतीय क्रमांक मिळवला. कविता प्रकारात हिंदी कवितेत प्रथम, तर मराठी व गुजराती कवितेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच मराठी निबंध लेखनात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी साहित्य क्षेत्रातील आपली प्रतिभा सिद्ध केली.

ललित कला विभागात क्ले मॉडेलिंग आणि रांगोळीमध्ये तृतीय क्रमांक मिळवण्यात आला.विविध कला, साहित्य, नृत्य आणि नाट्य प्रकारांत मिळालेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण सांस्कृतिक वाटचालीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.  हया विभागीय फेरीत विजेते ठरलेल्या महाविद्यालयाच्या संघांची मुंबई येथे होणाऱ्या विद्यापीठ पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यार्थीनींना शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील,शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर,  प्रशिक्षक युवराज डावरे, रोहित पाटील , विनायक पाटील प्रा.दिग्विजय कुंभार , प्रा. अविनाश पालकर  आदींचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes