कोरे अभियांत्रिकीत क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
schedule02 May 25 person by visibility 36 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त), वारणानगर येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठी "गुणगौरव सोहळा २ के२५" पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त कस्तुरी दीपक सावेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विविध विभागातील खेळाडूंना अॅथलेटिक्स, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि बुद्धिबळ या क्रीडा प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पारितोषिके प्रदान करण्यात आली. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. व्ही. कार्जिनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. बी. टी. साळोखे, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, डॉ. डी. एन. माने, डॉ. के. आय. पाटील, प्रितीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षी "ओव्हरऑल चॅम्पियनशिप" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाने पटकावला. या यशामागे विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, शैक्षणिक समन्वयक प्रा. जी. एस. कांबळे, विभागीय जिमखाना समन्वयक, प्रा.एस. एम. गडवीर आणि क्रीडा मार्गदर्शक उदय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचे जिमखाना समन्वयक डॉ. एस. एम. गडवीर यांनी केले.