Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सतेज पाटलांची सरकारवर बोचरी टीका, निवडणुकीनंतर लाडकी बहिण राज्य सरकारला सावत्र झालीफार्मसी क्षेत्रांमध्ये करिअरच्या अनेक वाटा- व्याख्याते प्रा. मधुकर पाटीलशाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज- चेअरमन अरुण डोंगळेप्रशासकीय अधिकारी मार्गदर्शिका पुस्तक विद्यापीठ- कॉलेज प्रशासन चालवण्यास उपयुक्त ठरेल – कुलगुरू डी. टी. शिर्केपशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा - डॉ. प्रमोद बाबरधडाडीचा कार्यकर्ता, अभ्यासू लोकप्रतिनिधी ! वाढदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन !!स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापण्यासाठी कोल्हापुरातूनही उभारले होते जन आंदोलन – प्राचार्य अभयकुमार साळुंखेपाल्यांचा गुणगौरव पाहताना पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडला ! महापालिका शाळेतील २१२ विद्यार्थ्यांचा सत्कार !!विद्या प्रबोधिनीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यूपीएससीतील यशवंतांचा सन्मानअमल महाडिकांकडून कामाचा धडाका, देवकर पाणंद - कळंबा साई मंदिर रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजूर

जाहिरात

 

अमल महाडिकांकडून कामाचा धडाका, देवकर पाणंद - कळंबा साई मंदिर रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजूर

schedule02 May 25 person by visibility 84 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर  रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून १ कोटी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच हा निधी कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग होऊन निविदा प्रक्रिया सुरू होईल. काही दिवसातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि प्रचंड धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर या रस्त्याची पाहणी केली होती. लवकरात लवकर दर्जेदार रस्ता करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी नागरिकांना दिली होती.
 
त्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या रस्त्यासाठी अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या होत्या. हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजुरी देण्याचा आग्रह आमदार महाडिक यांनी धरला होता. अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असणारा हा रस्ता डांबरीकरणाचा मार्ग सुकर झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes