Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सतेज पाटलांची सरकारवर बोचरी टीका, निवडणुकीनंतर लाडकी बहिण राज्य सरकारला सावत्र झालीफार्मसी क्षेत्रांमध्ये करिअरच्या अनेक वाटा- व्याख्याते प्रा. मधुकर पाटीलशाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज- चेअरमन अरुण डोंगळेप्रशासकीय अधिकारी मार्गदर्शिका पुस्तक विद्यापीठ- कॉलेज प्रशासन चालवण्यास उपयुक्त ठरेल – कुलगुरू डी. टी. शिर्केपशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा - डॉ. प्रमोद बाबरधडाडीचा कार्यकर्ता, अभ्यासू लोकप्रतिनिधी ! वाढदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन !!स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापण्यासाठी कोल्हापुरातूनही उभारले होते जन आंदोलन – प्राचार्य अभयकुमार साळुंखेपाल्यांचा गुणगौरव पाहताना पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडला ! महापालिका शाळेतील २१२ विद्यार्थ्यांचा सत्कार !!विद्या प्रबोधिनीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यूपीएससीतील यशवंतांचा सन्मानअमल महाडिकांकडून कामाचा धडाका, देवकर पाणंद - कळंबा साई मंदिर रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजूर

जाहिरात

 

पाल्यांचा गुणगौरव पाहताना पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडला ! महापालिका शाळेतील २१२ विद्यार्थ्यांचा सत्कार !!

schedule02 May 25 person by visibility 166 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध परीक्षेत यश संपादित केलल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली, दुसरी केटीएस परीक्षा, तिसरी ते सातवीपर्यंतची प्रज्ञाशोध परीक्षा, तयारी स्पर्धा परीक्षांची आणि राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजनेतील गुणवंतांना गौरविण्यात आले. राम गणेश गडकरी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची गर्दी होती. कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय ठरले. आपल्या पाल्याचा गुणगौरव पाहण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता. 

विविध परीक्षांमध्ये महानगरपालिका शाळेतील यशस्वी ठरलेल्या २१२ विद्यार्थ्यांना उपायुक्त कपिल  जगताप, प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, विजय माळी  चंद्रकांत कुंभार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणा-या १५५ शिक्षकांचाही ट्रॉफी  मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  उपायुक्त  जगताप यांनी, ‘विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपली ध्येयनिश्चिती करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने राबविलेले विविध उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात याचा निश्चित फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाप्रसंगी महानगरपालिकेच्या 'शाळांमधून निश्चीतच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे' अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या.  यावेळी जगदीश ठोंबरे, सूर्यकांत ढाले, अजय गोसावी, सचिन पांडव, राजेंद्र आपुगडे, विक्रमसिंह भोसले, आदिती पोवार, अस्मा गोलंदाज, अर्चना कुंडले, शमा खोमणे, दिपाली नाईक, शांताराम सुतार, लिपीक संजय शिंदे उपस्थित होते.  प्रकाश गावडे, स्मिता पुनवतकर यांनी सूत्रसंचालन केले.  

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes