Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात काँग्रेस चालवतो शिवसेना ठाकरे पक्ष, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्ट्रक्चरल इंजिनियर्सतर्फे शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर, काँग्रेसकडून निवडीसंबंधी महापौरांना पत्रकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसमृद्ध शाळा - समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत, जिल्हा नियोजन समितीत गौरवोद्गगारकोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळ – संध्याकाळच्या सत्रात विमानसेवा, दोन मार्चपासून प्रारंभमेन राजारामच्या विद्यार्थिनींनी जिंकली राज्यस्तरीय स्पर्धा ! पालकमंत्र्यांनी केले कौतुक, जिल्हा प्रशासनाने दिले बक्षीस!!शाहू मिलच्या डेव्हलपमेंटसंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक - पालकमंत्री प्रकाश अबिटकर सार्थक क्रिएशन्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रम, मान्यवरांचा सन्मान होणारअंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने, अन्यथा  गुरुवारपासून कामबंद आंदोलन

जाहिरात

 

सार्थक क्रिएशन्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रम, मान्यवरांचा सन्मान होणार

schedule11 Feb 26 person by visibility 92 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  येथील कला, संस्कृती,नृत्य साहित्य, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सार्थक क्रिएशन्स या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी, (१२ फेब्रुवारी २०२६) विशेष कार्यक्रम आयोजित केला अहे.  सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा येथे कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  साहित्यिक डॉ सुनीलकुमार लवटे हे उपस्थित राहणार आहेत.
संस्थेच्या २५ वर्षाच्या वाटचालीतील सदैव संस्थेच्या हितासाठी सहकार्य केलेल्या विविध क्षेत्रातील २५ मान्यवर व्यक्ती व संस्था यांचा सार्थक अभिमान पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
 यामध्ये सार्थक अभिमान पुरस्कार सतीश कुलकर्णी, कुलदीप शिंगटे, चारुदत्त जोशी, अनंत खासबारदार, सहज सेवा संस्था, हिल रायडर्स एडवेंचर फाउंडेशन, पार्थ शहा, डॉ निरंजन शहा, डॉ किमया शहा, संग्राम पाटील, उत्कर्षा पाटील, महेश हिरेमठ, आझाद नायकवडी,  महेश सोनुले, मिलिंद अष्टेकर, उदय चव्हाण, विजय टिपुगडे, राजेंद्र बनसोडे, उमेश नेरकर, मीनल ढापरे, अशोक रोकडे यांचा समावेश आहे.
तसेच युवा अभिमान पुरस्काराने  रोहित कदम, विपुल हळदणकर, ओंकार कोळेकर, विवेक कवाळे यांना
  गौरविण्यात येणार आहे. संस्थेच्या सामाजिक कर्तव्य उपक्रमांतर्गत लोटस फौंडेशनच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व २०२६-२७ साली या संस्थेसाठी सांस्कृक्तिक व कला उपक्रमासाठीची जबाबदारी घेण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत जागर अभिजात मराठीचा  हा लोकगीतांच्या कलाविष्कारचा  शुभारंभ  होणार आहे. संस्थेचे संस्थापक सागर बगाडे, संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळा समितीचे अध्यक्ष  रोहित पाटील, उपाध्यक्ष शेखर वळीवडेकर, करण मिरजकर, संजय कुंभार व सहकारी कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes