स्ट्रक्चरल इंजिनियर्सतर्फे शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा
schedule11 Feb 26 person by visibility 84 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स कोल्हापूर सेंटरच्या वतीने शनिवारी 14 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय स्तरावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे अशी माहिती कोल्हापूर सेंटरचे चेअरमन इंजिनिअर प्रशांत हडकर यांनी दिली. इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स कोल्हापूर सेंटर, शिवाजी विद्यापीठ व डिपार्टमेंट ऑफ अप्लाईड मेकॅनिक्स वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागातील सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेमध्ये प्रो. योगेंद्रसिंग, स्ट्रक्चरल इंजिनियर डॉ. विजय खोसे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सिव्हिल इंजिनियर्स, स्ट्रक्चरल कन्सल्टंट, शिक्षणतज्ञ तसेच उद्योगतज्ञासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधील प्रस्तावित सुधारणेबाबत मार्गदर्शन व चर्चा होणार आहे. पत्रकार परिषदेला प्रा. महेश साळुंखे, प्रशांत हावळ, डॉ. रश्मी जाधव, जिया मोमीन उपस्थित होते.