शाहू मिलच्या डेव्हलपमेंटसंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक - पालकमंत्री प्रकाश अबिटकर
schedule11 Feb 26 person by visibility 82 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शाहू मिल परिसरात राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक साकारण्यासह या जागेच्या डेव्हलपमेंट संदर्भात लवकरच जिल्ह्यातील आमदार खासदारांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवारी 11 फेब्रुवारी 2026 रोजी झाली. खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त ते मंजू लक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पालकमंत्री अबिटकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. तसेच नावीन्यपूर्ण योजना ही सांगितल्या. शाहू मिल परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू महाराज यांचे स्मारक प्रस्तावित आहे. त्या जागेचा विकास करण्यासंदर्भात जिल्ह्यातील आमदार व खासदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित केली जाणार आहे. शाहू मिल जागेचा डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल, त्या ठिकाणी कोणते प्रकल्प साकारता येतील यासंदर्भात चर्चा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या 50 गावांमध्ये गाव तिथे अभ्यासिका ही संकल्पना राबविण्यात येणार आहे याशिवाय कोल्हापूर शहरातील रहिवासी भागाचा सिटीसर्वे व प्रॉपर्टी कार्ड तयार करणे, हुपरी नगरपरिषद येथील विस्तारित क्षेत्राचे मोजणी करणे गारगोटी येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे, पालकमंत्री सरपंच गौरव अभियान अंतर्गत सरपंच उपसरपंचकरिता एक दिवसीय प्रशिक्षण व अभ्यासदौरा आयोजित करणे, जिल्हा परिषद व महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इस्त्रो विज्ञान शैक्षणिक सहल आयोजित करणे अशा विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.