Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंना भाजपकडून एबी फॉर्म, सोमवारी अर्ज भरणार!! शरद लाड, विजयसिंह मानेंची माघार अन भाजपला पाठिंबा जाहीर!!पुणे पदवीधर - शिक्षक भाजपकडे ! स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंची उमेदवारी घोषित !!मुश्रीफांनी सत्ताधर्म पाळला ! अश्वमेधचा घोडा अर्ध्यावर !! कौस्तुभ गावडेंवर वाढदिवसानिमित्त  शुभेच्छांचा वर्षाव, मुख्यमंत्र्यांच्यासह मंत्री -खासदार -आमदारांकडून अभिष्टचिंतनशिक्षकांनी मराठीला स्वप्नांची भाषा बनवावी, स्वप्नांची भाषा ही भवितव्याची असते – डॉ. सुनीलकुमार लवटेवीजग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा द्या – अंकुर कावळेशिक्षक मतदारसंघ भाजपकडे ! कौस्तुभ गावडेंची उमेदवारी जाहीर !!डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुराव्यासहित इतिहासाची पुनर्मांडणी  केली : प्राचार्य डॉ.डी. आर. मोरे गोकुळच्या जागा वाटपासाठी महायुतीच्या नेतेमंडळीवर दिल्लीला जाण्याची वेळ - आमदार सतेज पाटलांचा खोचक टोलाशिक्षक संघ पदवीधरच्या मैदानात ! एस. व्ही. पाटील निवडणूक लढविणार !!

जाहिरात

 

स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंना भाजपकडून एबी फॉर्म, सोमवारी अर्ज भरणार!! शरद लाड, विजयसिंह मानेंची माघार अन भाजपला पाठिंबा जाहीर!!

schedule04 Oct 26 person by visibility 461 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक लढविणारे भारतीय  जनता पक्षाचे उमेदवार स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, पुणे विभागीय प्रभारी शेखर इनामदार आदींच्या उपस्थितीमध्ये स्मिता जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  दरम्यान या सोहळयात पुणे पदवीधरमधील भाजपकडून निवडणुकीची तयारी करणारे शरद लाड, शिक्षक मतदारसंघातून इच्छुक उमेदवार व कोल्हापूर जिल्हा मध्यर्वी बँकेचे संचालक विजयसिंह माने यांनी नेतेमंडळींना जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयासोबत आपण आहोत. महायुतीचे उमेदवार जाधव व गावडे यांना निवडणूक आणण्यासाठी प्रचारात आपले पाऊल पुढे असेल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान गावडे व जाधव हे सोमवारी, पाच ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपकडून पुणे विभागीय व शिक्षक मतदारसंघासाठी रविवारी ४ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी घोषित केली. सायंकाळी पुणे येथे जाधव यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी भाजपकडून निवडणूक  लढविण्यासाठी इच्छुक उमेदवार शरद लाड, विजयसिंह माने, प्रथमेश कोल्हे हे व्यासपीठावर होती. महायुती अंतर्गत पुणे विभागीय मतदारसंघातील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा भाजपला मिळाल्या आहेत. हे दोन्ही उमेदवार महायुतीचे उमेदवार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी एकत्रित हा निर्णय घेतला आहे. असे चव्हाण यांनी सागितले. याप्रसंगी उमेदवारांनीही मनोगते व्यक्त केली. तसेच ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे इच्छुक उमेदवार लाड, माने, कोल्हे यांनी भाजपच्या नेतेमंडळींनी जो निर्णय घेतला आहे, त्यासोबत आपण असणार आहोत’ असे सांगितले.

 शरद लाड म्हणाले, ‘पदवीधर निवडणुकीला सामोरे जाण्याची ही आमची चौथी वेळ आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. ही निवडणूक नवीन नव्हती. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून नेतेमंडळीच्या मार्गदर्शनखाली मोठया संख्येने मतदार नोंदणी केली. दरम्यान संघटनेत पक्ष हित पहिल्यांदा असते. पक्ष हित साऱ्यांचे हित आहे. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पाटील व अन्य नेत्यांनी जो निर्णय दिला तो क्षणात मान्य केला. उमेदवार जाधव यांच्या प्रचारार्थ व त्यांना निवडणून आणण्यात माझे पाऊल पुढे असेल.  त्यांना निवडून आणण्याची माझी जबाबदारी आहे. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड व पुढारीकार ग. गो. जाधव यांच्यापासून या दोन कुटुंबांत ऋणानुबंध आहेत.

’ शिक्षक मतदारसंघातून तयारी केलेले विजयसिंह माने यांनी,‘मुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे अन्य नेते व जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे हे जे निर्णय देतील तो मान्य असेल आपण स्पष्ट केले होते. निवडणुकीसाठी मतदार नोंदणी मोठया संख्येने केले होते.  राजकारणात पुढे जात असताना काही वेळेला थांबावे लागते. पदवीधर व शिक्षकमधील महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणू. कुठेही कमी पडणार नाही. प्रत्येकाने जबाबदारी समजून काम करावं.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes