Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कौस्तुभ गावडेंवर वाढदिवसानिमित्त  शुभेच्छांचा वर्षाव, मुख्यमंत्र्यांच्यासह मंत्री -खासदार -आमदारांकडून अभिष्टचिंतनशिक्षकांनी मराठीला स्वप्नांची भाषा बनवावी, स्वप्नांची भाषा ही भवितव्याची असते – डॉ. सुनीलकुमार लवटेवीजग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा द्या – अंकुर कावळेशिक्षक मतदारसंघ भाजपकडे ! कौस्तुभ गावडेंची उमेदवारी जाहीर !!डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुराव्यासहित इतिहासाची पुनर्मांडणी  केली : प्राचार्य डॉ.डी. आर. मोरे गोकुळच्या जागा वाटपासाठी महायुतीच्या नेतेमंडळीवर दिल्लीला जाण्याची वेळ - आमदार सतेज पाटलांचा खोचक टोलाशिक्षक संघ पदवीधरच्या मैदानात ! एस. व्ही. पाटील निवडणूक लढविणार !!सेवानिवृत्तीनिमित्त महावीर सोळाकुंरे यांचा रविवारी गौरव समारंभकाँग्रेसची उमेदवारी जाहीर, पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकरइंडियन प्लबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

जाहिरात

 

शिक्षक संघ पदवीधरच्या मैदानात ! एस. व्ही. पाटील निवडणूक लढविणार !!

schedule03 Oct 26 person by visibility 187 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यात शिक्षकांच्या विविध संघटना आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ थोरात गट ही प्रमुख संघटना. संघटनेचे राज्यभर नेटवर्क. शिक्षकांसाठी काम करणाऱ्या या संघटनेने यंदा साऱ्यांनाच धक्का देत पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी, शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पाटील हे सोमवारी, पाच ऑक्टोबर २०२६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

शिक्षक संघ राज्यभर विस्तारले आहे. पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्हयात शिक्षक संघ कार्यरत आहे. संघाशी निगडीत असंख्य शिक्षक पदवीधर मतदार आहेत. पदवीधर मतदारांच्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक लढविण्याचा संघाचा विचार आहे. यासाठी शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना आहेत. एस.व्ही. पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ३८ वर्षाहून अधिक काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम केले आहे. संघटनेते पहिल्यापासून सक्रिय आहेत. कोल्हापुरातील दि प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक, अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्था कोल्हापूरचे ते संस्थापक चेअरमन आहेत.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत निमंत्रित सदस्य म्हणून कामाचा अनुभव आहे.

यासंदर्भात एस. व्ही. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘शिक्षक संघ, शिक्षकांशी निगडीत विविध संस्थेतील कामाचा अनुभव यामुळे शिक्षक नेते संभाजी थोरात यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत. सोमवारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन आहे. शिक्षक नेत्यांचे पाठबळ, पदवीधर शिक्षकांची ताकत आणि संघटनेची साथ या जमेच्या बाजू आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या पाचही जिल्ह्यात शिक्षक संघाचे नेटवर्क आहे. संघटनेच्या माध्यमातून शिक्षक व पदवीधरांशी जोडलो आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes