पुणे पदवीधर - शिक्षक भाजपकडे ! स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंची उमेदवारी घोषित !!
schedule04 Oct 26 person by visibility 1110 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची उमेदवारी मिळवण्यात भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महायुती अंतर्गत या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. पदवीधर मतदारसंघातून पुढारीचे समूह संपादक योगेश जाधव यांच्या पत्नी डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. तर शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांची उमेदवारी जाहीर झाली. जाधव या पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिह जाधव यांच्या स्नुषा आहेत. तसेच त्या पुणे येथील शिक्षण क्षेत्रातील मोठी असामी पी. डी. पाटील यांच्या कन्या आहेत.
गावडे यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी केली आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत शिक्षक मतदार संघातून तरुण चेहरा मैदानात उतरवला आहे. तसेच गावडे हे शिक्षण संस्थेची निगडित आहेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे नेटवर्क राज्यांमध्ये विविध ठिकाणी आहे कोल्हापूर सांगली सातारा, पुणे सोलापूर या ठिकाणी गावडे यांनी शिक्षक मतदार नोंदणी केले आहे. तसेच गेले काही महिने ते पाचही जिल्ह्यांचा संपर्क दौरा करून शिक्षकांशी संवाद साधला आहे. इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे महायुतीमध्ये शिक्षक मतदार संघातून उमेदवार कोण ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. भाजप सोबत शिवसेना शिंदे गटाने ही या मतदारसंघांमध्ये उमेदवारीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहायक प्रा. सचिन सानप यांनीही उमेदवारी मागितली होती. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार ? याकडे राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागली होती. भाजपने गावडे यांना पसंती देत शिक्षक मतदार संघातून तरुण चेहरा समोर आणला आहे .पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून भैया माने यांनी तयारी केली होती. मात्र महायुतीकडून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी पदवीधर मतदार संघ डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्यांच्या पक्ष प्रवेश यावेळी भाजपच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी शब्द दिला होता. मात्र गेल्या काही दिवसाच्या राजकीय घडामोडीत त्यांचे नाव मागे पडले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय मुख्यालय प्रभारी तरुण घुग यांनी उमेदवारी घोषित केली आहे.