सेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समिती सदस्यपदी आनंद माने
schedule18 Oct 25 person by visibility 58 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर येथील बांधकाम व हॉटेल व्यावसायिक आनंद शंकरराव माने यांची सेंट्रल रेल्वेच्या पुणे विभागीय प्रवासी सल्लागार समिती पुणे झोनच्या सदस्यपदी निवड झाली. खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या शिफारशीवरुन त्यांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांचा कार्यकाळ असणाऱ्या या समितीत त्यांनी यापूर्वीही कार्य केले आहे. माने यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असताना कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे सुरु होणेसाठी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या होत्या. तसेच सेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समितीत काम करताना कोल्हापूर रेल्वे स्थानकावर असणाऱ्या समस्या मांडल्या होत्या. त्या समस्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना देखील सांगितल्या होत्या. रेल्वे च्या प्रश्नांसंबंधी त्यांच्या असणाऱ्या अनुभवावरुन त्यांची चौथ्यांदा निवड झाली.