Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कारकरवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्राकाँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलनकोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !

जाहिरात

 

कुलगुरुपदासाठीच्या अर्जांचे शॉर्टलिस्ट, २५ जणांची यादी तयार ! एप्रिलमध्ये मुलाखती ! !

schedule13 Mar 26 person by visibility 154 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापू : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी प्राप्त ११५ अर्जांचे शॉर्टलिस्ट तयार करण्यात आले आहेत. कुलगुरू शोध व निवड समितीने शॉर्टलिस्ट केल्यानंतर  २५ जणांची नावे मुलाखतीसाठी निश्चित केली आहेत. येत्या तीन व चार एप्रिल रोजी मुंबई येथे त्यांच्या मुलाखती होतील. या मुलाखतीच्या प्रक्रियेतून पाच उमेदवारांची नावे कुलगुरुपदासाठी कुलपती कार्यालयाकडे सादर होतील. कुलपतींमार्फत त्या पाच जण उमेदवारांतून एका उमेदवाराची कुलगुरू म्हणून निवड होते.

तत्कालिन कुलगुरू डी. टी. शिर्के शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपला. सध्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे तर प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव आहेत. दरम्यान कुलगुरू शोध समितीने कुलगुरुपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. २३ डिसेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ११५ जणांनी अर्ज दाखल केले. फेब्रुवारी महिन्यात त्या अर्जांची छाननी झाली. त्यातून समितीने २५ उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केली आहेत. यामध्ये मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण, पदार्थ विज्ञान विभागप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे डॉ. श्रीकृष्ण महाजन, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर आदींचा समावेश आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes