Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघारचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयीगल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !सांगलीत भाजप चितपट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदी महाविकास आघाडी विजयी !सीईओची ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदीगोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूदजुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागत

जाहिरात

 

सीईओची ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदी

schedule18 Mar 26 person by visibility 76 categoryजिल्हा परिषद

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या उत्पादित मालांचे प्रदर्शन व विक्रीचे व्यासपीठ असलेल्या ताराराणी महोत्सव व मिनी सरस या प्रदर्शनाला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी बुधवारी दुपारी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी महिला बचत गटांच्या विविध स्टॉलला भेटी दिल्या तसेच त्यांच्याकडून उत्पादित वस्तूंची खरेदी केली.
ग्राम विकास व पंचायत राज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सासने मैदान येथे 14 ते 18 मार्च 2026 या कालावधीत ताराराणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये खाद्यपदार्थ,  मसाले,  ग्रामीण कलाकुसरयुक्त विविध वस्तूंचा समावेश आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू हे या महत्त्वाचे खास आकर्षण. खाद्यपदार्थांचे स्टॉल खवय्यांना आकर्षित करत आहेत. बुधवारी दुपारी, सीईओ कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विपणन विभागाच्या अधिकारी सुप्रिया पाटील यांनी विविध स्टॉलला भेटी दिल्या. प्रदर्शनात सहभागी महिला बचत गटांच्या स्टॉलची पाहणी केली. यादरम्यान सीईओ कार्तिकेयन  यांनी महिला बचत गटांच्या कडून काही वस्तू खरेदी केल्या. ठिकपुरली बर्फीची ही चव चाखली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes