Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कौस्तुभ  गावडे - मयुरी  पाटील यांचा  विवाह  थाटामाटात   अरुंधती महाडिकांची अध्यक्षपदाची कारकिर्द ठरली संस्मरणीय ! रोटरी मिडटाऊनला पंधरा पुरस्कार !!शुक्रवारी शाळा सुट्टीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशशिवसेनेच्या तरुण नेतृत्वाकडे विकासात्मक दृष्टी ! सचिन पाटलांची नाळ समाजकार्याशी जुळलेली! !जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना विजय पाटील भाजपातमहे-जरगवाडीत घुमला शिवसेनेचा आवाज, सचिन पाटलांच्या प्रचारफेरीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिप

जाहिरात

 

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना विजय पाटील भाजपात

schedule04 Feb 26 person by visibility 66 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुडशिंगीच्या मतदारसंघाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना पाटील आणि माजी पंचायत समिती सभापती विजय पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत वंदना पाटील या काँग्रेसकडून विजयी झाल्या होत्या. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
गडमुडशिंगी आणि गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदार संघातील समर्थकांसह पाटील पती-पत्नी भाजपात दाखल झाले. आमदार अमल महाडिक यांच्या विकासाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. दोन्ही जिल्हा परिषद मतदार संघामध्ये भाजप उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली. यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष चारुदत्त तिपकोंडा पाटील, माजी सरपंच नरसगोंडा सातगोंडा पाटील, जवाहर कारखान्याचे व्यवस्थापक उत्तम दौलतराव कुंभार, कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी बँकेचे संचालक विष्णुपंत कुंभार, शितल भेंडवडे, सनी कोशिंबरे, विजय पाटील रोहित पाटील, आनंदा गुरव, तन्मय पाटील, अण्णासाहेब कुंभोजे, माजी उपसरपंच रोहित पाटील, महावीर व्हसामणी,माजी सरपंच राजगोंडा पाटील, माजी सरपंच सोनबा कोळी, अण्णासो पाटील सावकर, महावीर पाटील चिंचवडकर, महावीर पाटील,अण्णासो पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes