Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कौस्तुभ  गावडे - मयुरी  पाटील यांचा  विवाह  थाटामाटात   अरुंधती महाडिकांची अध्यक्षपदाची कारकिर्द ठरली संस्मरणीय ! रोटरी मिडटाऊनला पंधरा पुरस्कार !!शुक्रवारी शाळा सुट्टीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशशिवसेनेच्या तरुण नेतृत्वाकडे विकासात्मक दृष्टी ! सचिन पाटलांची नाळ समाजकार्याशी जुळलेली! !जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना विजय पाटील भाजपातमहे-जरगवाडीत घुमला शिवसेनेचा आवाज, सचिन पाटलांच्या प्रचारफेरीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिप

जाहिरात

 

महे-जरगवाडीत घुमला शिवसेनेचा आवाज, सचिन पाटलांच्या प्रचारफेरीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद

schedule04 Feb 26 person by visibility 199 categoryजिल्हा परिषद

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन विश्वास पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी, चार फेब्रुवारी रोजी सकाळी महे- जरगवाडी भागात प्रचार फेरी क काढण्यात आली. या प्रचारफेरीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन पाटील व शिरोली दुमाला पंचायत समितीचे उमेदवार नामदेव खांडेकर यांनी घर टू घर जाऊन मतदारांशी संपर्क साधला. धनुष्यबाण  या चिन्हावर बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन केले
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. अधिकाधिक मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत आहेत. पाडळी जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेने तरुण चेहरा दिला आहे. गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे चिरंजीव व शिरोली दुमाला येथील  सरपंच सचिन पाटील हे उमेदवार आहेत. बुधवारी सचिन पाटील व पंचायत समितीचे उमेदवार खांडेकर यांनी महे- जरवाडी भागात प्रचार फेरी काढली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या प्रचारफेरीला सुरुवात झाली. यामध्ये गावातील नागरिक मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. महे -जरगवाडी, धनगरवाडा या भागात प्रचारफेरी काढण्यात आली.
 हनुमान दूध संस्थेचे चेअरमन बुद्धिराज पाटील, कुंभी कारखान्याचे संचालक सर्जेराव हुजरे, सचिन पाटील, इंद्रजीत पाटील, प्रकाश आसुरलेकर, आशिष पाटील, रामचंद्र पाटील, आकाश जरग, प्रदीप जरग, दत्तात्रय हुजरे, एस.डी. जरग, सर्जेराव पाटील, युवराज पाटील, जितेश शिंदे, सुनील वाइंगडे आदींचा सहभाग होता आदींचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes