Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर ! एक ते १९ प्रभाग चार सदस्यीय, वीस क्रमांकाच्या प्रभागात पाच नगरसेवक !!माजी सैनिक पत्नीसह गिरविणार दूरशिक्षणाचे धडे संयुक्त न्यू शाहूपुरीतर्फे एकत्रित मिरवणूकअमल महाडिकांनी केली पाचगाव केंद्र शाळेची पाहणीओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवा, कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलनकसबा बीड महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजराआरोग्य विभागाशी निगडित दोन मंत्री कोल्हापूरचे, एनएचएमचे कर्मचारी समायोजनासाठी दहा दिवस रस्त्यावरगणेशोत्सवातील कामांना शिक्षकांचा विरोध, सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचाच जयजयकार, साडेतीन लाखाहून अधिक मूर्ती संकलितसाऊंड सिस्टीम-लेझर लाईटला फाटा देणाऱ्या खंडोबा तालीम मंडळाचा सत्कार   

जाहिरात

 

वारणा विद्यापीठाच्या खेळाडूंची बास्केटबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

schedule30 Aug 25 person by visibility 89 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी जानवी खामकर व यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षला पाटील  यांची ७५ व्या ज्युनियर बास्केटबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी  महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या १२ जणांच्या संघात निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा दोन ते नऊ सप्टेंबर २०२५ दरम्यान लुधियाना येथे होणार आहे. या यशाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिनी,  यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. क्रीडा प्रशिक्षक उदय पाटील  यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes