Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रशासनाकडून तारीख पे तारीख ! संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम कासवगतीने !! अद्ययावत आयटी पार्कचा कालबद्ध रोडमॅप करा, सरकारकडून जे जे होईल ते सहकार्य करू -पालकमंत्री प्रकाश आबिटकरआयटी असोसिएशनचा अनोखा संकल्प ! तोपर्यंत नो फेटा…नो सत्कार ! !सुनावणीस विलंब, प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक ! सहायक निबंधक कार्यालयावर धडक !!कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरगांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची महापालिका करणार तपासणी , शुक्रवारपासून सुरुवातज्यांच्याकडे मतांची शक्ती नाही, गोकुळच्या घडामोडीवरुन भैया मानेंनी डिवचलेशिक्षण समिती सभापतींच्या बैठकीत शाळांचा दर्जा सुधारणेबाबत चर्चामित्र - बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशी

जाहिरात

 

अद्ययावत आयटी पार्कचा कालबद्ध रोडमॅप करा, सरकारकडून जे जे होईल ते सहकार्य करू -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

schedule25 Apr 26 person by visibility 31 categoryउद्योग

कोल्हापूर आयटी पार्कला छत्रपती ताराराणी यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील - आमदार राजेश क्षीरसागर

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापुरात आयटीपार्क साकारणं हे साऱ्यांचेच स्वप्नं आहे. आयटी पार्कमुळे शहरांसह जिल्हयाच्या विकासाला गती लाभणार आहे. आयटी व्यावसायिकांनी, कोल्हापुरातील आयटी पार्क कशा पद्तीने विकसित करायचा यासंबंधींचा कृती आराखडा तयार करावा, हा कालबद्ध रोडमॅप तयार करुन सादर कराआयटी पार्क लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सरकारकडून जे जे होईल ते सहकार्य करू. आयटी पार्कसाठी अतिशय पोषक वातावरण कोल्हापुरात बनवू’अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

कोल्हापुरात आयटी पार्कसाठी राज्य सरकारने शेंडा पार्क येथे जवळपास शंभर एकर जागा मंजूर केली आहे. यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकाऱ्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित हा कार्यक्रम रेसिडेन्सी क्लब येथे झाला.  पालकमंत्री आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी केलेल्या प्रयत्नांचा ऊहापोह केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  व जिल्ह्यातील साऱ्याच लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे हा आयटी पार्कसाठी सरकारने जागा मंजूर केली. अधिवेशनात याविषयी लक्षवेधी मांडली होती. कोल्हापुरातील शाश्वत विकास परिषदेत आयटी पार्क, फौंड्री हब हे विषय ठळकपणे मांडले. कोल्हापुरातील आयटी पार्कमध्ये बेस्ट पायाभूत सुविधा निर्माण करु. या आयटी पार्कला छत्रपती ताराराणी यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्कमध्ये कोल्हापुरातील आयटी व्यावसायिकांना प्राधान्यक्रम राहील’

महापौर निकम यांनी बोलताना कोल्हापुरातील आयटी पार्कमध्ये स्थानिक आयटी व्यावसायिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी सारे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील,सचिव राहूल मेंच यांनी आयटी पार्कसंबंधी सादरीकरण केले. याप्रसंगी आयटी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे, उपाध्यक्ष धवल चौगले, खजानिस रणजीत नार्वेकर, संचालक आदिनाथ पाटील, विश्वजीत देसाई, मंदार पेटकर, मनीष राजगोळकर, नामदेव पाटील, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, प्रसन्न तेरदाळकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes