Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागउमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोगसंजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप मोरे, व्हाईस चेअरमनपदी जयकुमार रेळेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा ३५५ केंद्रावर कृष्णराज महाडिकांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक !

जाहिरात

 

शाहू महाराज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोग

schedule02 Mar 26 person by visibility 34 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल येथेनोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही. रामण यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त प्रथमत: ज्येष्ठ विज्ञान शिक्षक गायकवा यांच्या हस्ते वृक्षाला जलदान करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख सन्माननीय श्रीराम साळुंखे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.जे. सावंत, प्राथमिक विद्यामंदिचे मुख्याध्यापक एस. व्ही .पोवार उपस्थित होते. यादिनाचे औचित्य साधून केतकी सूर्यवंशी, अपर्णा गडकरी, शौर्य वर्धन, अनिरुद्ध पानारी व प्रणव कांबळे या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग  करून दाखवले तसेच इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटच्या  शर्वरी पवार यांनी विज्ञान मॉडेलस दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विद्या कामत यांनी केले. के.स. पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes