शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
schedule02 Mar 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्येअंकुरम २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. . विज्ञान दिनानिमित्त आयक्यूएसी विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमातंर्गत महाविद्यालयात विविध स्पर्धा झाल्या. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रमुख पाहुणे प्रतिपादन केपीआयटी कॉलेजचे प्राचार्य संतोष मोरे यांनी, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून प्रत्यक्ष कौशल्ये, नवकल्पना आणि तांत्रिक प्रावीण्य यांचा संगम विद्यार्थ्यांच्या यशासाठी अत्यावश्यक आहे.ज्ञानासोबत कौशल्यांचा संगम आवश्यक आहे,’ असे सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन अधिक सुलभ, वेगवान आणि परिणामकारक झाले आहे. मात्र या साधनांचा वापर योग्य, जबाबदारीने आणि सकारात्मक दृष्टीकोनातून होणे आवश्यक आहे, असे मत डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रिसर्च प्रोजेक्ट स्पर्धेत तृतीय क्रमांक मयुरी पाटील व शितल पवार, द्वितीय क्रमांक अनुजा बुरुड व श्रावणी चौगले यांनी मिळवला, तर प्रथम क्रमांक स्नेहा खानापुरे हिने पटकावला. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत द्वितीय क्रमांक सोनम पाटील व सानिया माने यांना मिळाला, तर प्रथम क्रमांक अनिकेत पाटील व सिद्धेश पाटील यांनी प्राप्त केला. सी प्रोग्रामिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक संयुक्तरित्या विजया बेलवळे व वंशिका बेलवळे यांनी मिळवला. प्रथम क्रमांक विनयराज कोरे यांनी पटकावला. तसेच पर्यावरण जनजागृती रील मेकिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक वेदांत पाटील व आदित्य कांबळे यांनी मिळवला. प्रथम क्रमांक विनयराज कोरे यांनी मिळवून स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. तेजस्विनी परबकर यांनी सूञसचालन केले. प्रा. दिग्विजय कुंभार यांनी आभार मानले. उपप्राचार्य सागर शेटगे, विशालसिंह काबळे उपस्थित होते.