Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लिंगायत समाजाचे रविवारी धरणे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनमुख्यमंत्री महोदय !  विद्रूपीकरणाचे उद्घाटन करू नका, मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन ! ! सर्वपक्षीय शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा !  महापौर म्हणाल्या, साऱ्यांनी मिळून डी.वाय. पाटील यांचे स्मारक साकारू ! !गोकुळतर्फे दूध खरेदी- विक्री दरात वाढजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय शिंदेएआय मुळे जग बदलेल , बदलत्या जगासाठी माणसाने स्वतःला तयार करावे - आयटी शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंतशिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखेंच्या स्मृतीदिनानिमित्त बालस्केटिंगपटूतर्फे स्मृतीज्योतमंत्र्यांनी केली केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी, रविवारच्या कार्यक्रमाचा घेतला आढावा !!शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी बनले सांख्यिकी अधिकारीमहापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना केएमटीचा मोफत बस पास, ७५५ विद्यार्थ्यांना पासचे वितरण

जाहिरात

 

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय शिंदे

schedule08 Aug 26 person by visibility 106 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  कोल्हापूर  जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय श्रीपतराव शिंदे यांची निवड करण्यात आली. सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठकञरविवारी आठ ऑगस्ट २०२६ रोजी झाली. 

 सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतील कार्यालय अधीक्षक   यु. एस. उलपे  होते. चेअरमनपदासाठी शिंदे यांचे नाव जयकुमार रेळेकर यांनी सुचवले. तर संचालक श्रीकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सहकारामधील दिपस्तंभ व उल्लेखनिय कारभाराबाबत नावलौकीक प्राप्त केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची मातृसंस्था असलेल्या या संस्थेने जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील कर्मचारी यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक उत्कर्ष करण्यामध्ये या संस्थेने नेहमीच मोलाचा हातभार लावलेला आहे. संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करणेस आम्ही सर्व संचालक व सुकाणू समिती कटिबध्द आहोत. भविष्यात संस्थेच्या नावलौकीकात भरीव वाढ करणेकामी निश्चित नियोजनबद्द काम करणेची ग्वाही दिली तसेच यापुढेही संस्थेचा कारभार सुकाणू समितीच्या मार्गदर्शनानुसार व सर्व संचालकांच्या सहकार्याने सभासदांच्या हिताचा व पारदर्शकपने, काटकसरीने करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणार असलेचे नुतन चेअरमन शिंदे यांनी  सांगीतले.

निवडीवेळी व्हाइस चेअरमन जयकुमार रेळेकर, संचालक बाजीराव पाटील, नंदिप मोरे, श्रीकांत चव्हाण, रविंद्र जरळी, सुनिल पाटील, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहूलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, सरदार दिंडे, सरोजनी कोरी, सोनाली गुरव तज्ञ संचालक - प्रविणकुमार पाटील, स्वप्निल घस्ते  उपस्थित होते. यानंतर संस्थेचे मार्गदर्शक- एम.आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकूरे, एम.एम. पाटील, के. आर. किरूळकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट, कपिल पाटील यांनी नूतन चेअरमनांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes