Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लिंगायत समाजाचे रविवारी धरणे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनमुख्यमंत्री महोदय !  विद्रूपीकरणाचे उद्घाटन करू नका, मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन ! ! सर्वपक्षीय शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा !  महापौर म्हणाल्या, साऱ्यांनी मिळून डी.वाय. पाटील यांचे स्मारक साकारू ! !गोकुळतर्फे दूध खरेदी- विक्री दरात वाढजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय शिंदेएआय मुळे जग बदलेल , बदलत्या जगासाठी माणसाने स्वतःला तयार करावे - आयटी शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंतशिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखेंच्या स्मृतीदिनानिमित्त बालस्केटिंगपटूतर्फे स्मृतीज्योतमंत्र्यांनी केली केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी, रविवारच्या कार्यक्रमाचा घेतला आढावा !!शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी बनले सांख्यिकी अधिकारीमहापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना केएमटीचा मोफत बस पास, ७५५ विद्यार्थ्यांना पासचे वितरण

जाहिरात

 

गोकुळतर्फे दूध खरेदी- विक्री दरात वाढ

schedule08 Aug 26 person by visibility 609 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) शी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करून श्रावण महिन्याच्या प्रारंभी दूध उत्पादकांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आला आहे.  ११ ऑगस्ट २०२६ पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया वाढ करण्यात आली आहे. तसेच गोकुळच्या म्हैस दूध विक्री दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.यानुसार ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ. गुणप्रतिच्या म्हैस दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ५३.५० रुपयांवरून ५५ रुपये, तर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. गुणप्रतिच्या गाय दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३६ रुपयांवरून ३७ रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त दर मिळणार आहे.

   दरम्यान, गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, (हि दरवाढ दि.१०/०८/२०२६ च्या मध्यरात्री पासून लागू होईल) गाय दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.    

  गोकुळशी संलग्न सुमारे ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून सध्या प्रतिदिन सरासरी १४ ते १५ लाख लिटर दूध संकलित केले जाते. दूध उत्पादक हे गोकुळचे केंद्रबिंदू असून, त्यांच्या दुग्ध व्यवसायाला स्थैर्य मिळावे आणि उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघ सातत्याने प्रयत्नशील आहे.

 सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती, दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरातील वाढ आणि एकूणच महागाईचा सर्वंकष विचार करून दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत प्रशासकीय मंडळाने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी संघ सदैव तत्पर आहे, असे गोकुळचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes