Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडेवालावलकर हायस्कूलची रिले स्पर्धेत चमक,  विभागीय स्पर्धेसाठी निवडशिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठी आमचा लढापुण्यात  आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६चे उद्घाटनकौस्तुभ कामाचा, शिक्षकांच्या हक्काचा…!पार्किंगच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई, हॉटेल्स-हॉस्पिटल्स-व्यापारी संकुलांच्या बांधकामांची तपासणीस्मॅकच्या वार्षिक सभेत यतीन शाहांच्या मुलाखतीतून गवसली उद्योग - व्यवसायाची यशस्वितेची सूत्रे, सहा युवा उद्योजकांचा गौरवकेएमएतर्फे दोन दिवसीय वैद्यकीय परिषद, डॉ. विवेकानंद कुलकर्णींना जीवन गौरव पुरस्कारऑडिओ क्लिपमधील चर्चा करणारे भाजपशी संबधित, भाजपने स्पष्टीकरण द्यावे - मंत्री उदय सामंत शिक्षक-शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी  प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा : मालोजीराजे छत्रपती 

जाहिरात

 

ऑडिओ क्लिपमधील चर्चा करणारे भाजपशी संबधित, भाजपने स्पष्टीकरण द्यावे - मंत्री उदय सामंत

schedule22 Oct 26 person by visibility 86 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेली ऑडिओ क्लिप गंभीर असून मराठा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक आणि सायबर सेलकडून चौकशी व्हावी, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या क्लिपमधील चर्चा करणाऱ्या व्यक्ती भाजप पक्षाशी संबधित असून त्यांच्या आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून त्याचे सत्य समोर आले पाहिजे. ही क्लिप म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बदनामीचे षडयंत्र असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे मंत्री सामंत यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाचे आंदोलन चांगल्या पद्धतीने हाताळले होते, त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली होती, मात्र त्यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य या पूर्ण आडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतात. या ऑडिओमध्ये भाजपच्या सोशल मिडियाशी संबधित श्वेता शालिनी, आमदार अतुल भातखळकर, युट्यूबर सुशील कुलकर्णी यांच्यासारखा आवाज आहे. या ऑडिओ क्लिपमधून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ही ऑडिओ क्लिप कोणी रेकॉर्ड केली, कशासाठी व्हायरल केली व त्यात मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होता का, याची चौकशी केली गेली पाहिजे, असे मंत्री सामंत म्हणाले. 

सामंत म्हणाले, यात काही संबंध नसताना डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख करण्यात आला. डॉ. शिंदे यांचा उल्लेख केल्यानंतर एकनाथ शिंदे बदनाम होतील, शिवसेना बदनाम होईल, अशा प्रकारचे षडयंत्र ऐकायला मिळते, हे दुर्देवी आणि गंभीर आहे. ऑडिओ क्लिपमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ५०० कोटी रुपये जरांगे पाटील यांना दिले, असे वक्तव्य भाजपशी संबधित असलेल्या श्वेता शालिनी यांनी केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याचे काम खासदार डॉ. शिंदे यांनी केले, मात्र त्यांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न या क्लिपमध्ये झालाय. खासदार डॉ. शिंदेंचा उल्लेख करणाऱ्या महिलेने याचे पुरावे सादर केले पाहिजेत, अशी मागणी मंत्री सामंत यांनी केली आहे. क्लिपमध्ये जे कोणी बोललेत त्यांचा आवाज खरा की खोटा यासाठी क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून त्याचे सत्य जनतेसमोर आले पाहिजे. त्यांचा आवाज खरा असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करणार हे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलं पाहिजे, असे मंत्री सामंत म्हणाले.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes