Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संजय भोसलेंचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून नामंजूर, आयुक्तांनी निलंबित करावे – भूपाल शेटेटाकाऊतून टिकाऊ, भंगारातील गाडयांचे ट्रकमध्ये रुपांतर ! कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आयुक्तांची शाबासकी ! !काँग्रेसचे नगरसेवक धावले पंपिंग स्टेशनकडे, आयुक्त अधिकाऱ्यांकडूनही पाहणीपाण्याच्या उपलब्धतेच्या ठिकाणांवरील उपसाबंदी उठवावी, इरिगेशन फेडरेशनची मागणीटिक टिक वाजते डोक्यात… उलगडले घडयाळाशी जुळलेले बंध ! प्रकटला राजकारणापलीकडील कृतज्ञतेचा भाव !!जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ, २६६ खेळाडूंचा सहभागटीईटी परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज, शहरातील ५४ केंद्रावर ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्तीज्युनिअर कॉलेजच्या संचमान्यतेवरुन आमदारांचा हल्लाबोल ! शिक्षण आयुक्त हटवा...शिक्षण क्षेत्र वाचवा !!उत्साह, स्वागत - नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा  वाजली !  प्रवेशोत्सवासह नशामुक्त कोल्हापूरची शपथ !! चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले, उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदे

जाहिरात

 

विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता समजून घेत पालकांनी स्वप्नांना पाठबळ द्यावे - सचिन मेनन

schedule07 Jun 26 person by visibility 225 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘बदलत्या काळातील करिअरच्या नव्या वाटा समजून घेत पालकांनी विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता आणि स्वप्नांना पाठबळ द्यावे. योग्य संधी मिळाल्यास आजची तरुण पिढी जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकते. विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.’असे आवाहन केआयटी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन यांनी केले.

केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२६’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायबर संस्थेच्या आनंद भवन सभागृह येथे हा कार्यक्रम झाला.  संस्थेचे विश्वस्त सुनील कुलकर्णी यांनी, ‘संस्थेचा संघर्षमय प्रवास, मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोनची माहित दिली. तसेच  केआयटीच्या यशस्वी वाटचालीमागील प्रेरणादायी प्रवास त्यांनी पालकांसमोर उलगडला. संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील अमर्याद संधी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री 4.0 मुळे अभियांत्रिकी क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर न थांबता कौशल्याधारित शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता याकडेही लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात अधिष्ठाता (प्रवेश) डॉ. महेश शिंदे यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया २०२६ संदर्भातील सर्व महत्त्वाच्या बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे, आवश्यक कागदपत्रे, बदललेले नियम, अर्ज भरण्याची पद्धत, ऑप्शन फॉर्मचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली.  संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली व सचिव दीपक चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी संस्थेचे रजिस्ट्रार डॉ. डी. जे. साठे उपस्थित होते. प्रा. श्रुती काशीद यांनी प्रास्ताविक प्रा. अमर टिकोळे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes