जुनी पेन्शन संघटना करवीर शाखेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा गौरव
schedule08 May 25 person by visibility 65 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जुनी पेन्शन संघटनेचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे जानेवारी २०२५ मध्ये अत्यंत नियोजनबद्ध घेतलेल्या शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा, प्रशासनामध्ये शिक्षकांच्या कामासाठी मिळणारे सहकार्य, आजचा गुणगौरव सोहळा अभिनंदनीय आहे. तरुण शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या सहकाऱ्यांना प्रशिक्षित करून शाळेचा विकास करावा.’असे आवाहन करवीरचे गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा करवीर यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत ७५ गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यानिकेतन क्रीडा प्रशाला शिंगणापूर या ठिकाणी कार्यक्रम झाला. क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, व्हिडिओ निर्मिती, आदर्श शिक्षक, नूतन निवड झालेले संचालक, नवीन शिक्षणसेवक तसेच आंतरजिल्हा बदली होऊन आलेले शिक्षक या सर्वांचा कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. करवीर तालुक्याचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दरम्यान आकुर्डे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानचिन्ह व शाल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश आंग्रे, अर्चना पाथरे, शिक्षक बँक व्हाइस चेअरमन पद्मजा मेढे, संचालक अमर वरुटे, मुख्याध्यापिका आशा शेळके, सरचिटणीस विजय रामाने, जिल्हा प्रवक्ता प्रमोद पाटील, भुदरगड तालुकाध्यक्ष बाबुराव कांबळे, संजय पाटील, धनाजी सासणे, बाबा धुमाळ, प्रवीण पाटील उपस्थित होते.
संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी प शिक्षक बंधू-भगिनींचे कौतुक व्हावे, त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठीच हा गुणगौरव सोहळा आयोजित केला असल्याचे सांगितले. शिक्षण विस्तार अधिकारी विजय ओतारी, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी मानकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, शिक्षिका अस्मिता पाटील यांची मनोगते झाली. संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबुराव निकम यांनी स्वागत केले. महिला तालुकाध्यक्ष स्नेहा माळी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष आरती पोवार यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदा बनकर, नितीन कांबळे, मिलिंद कांबळे, अमर पाटील, अरुण टिपुगडे, संतोष चिमले, मुरली कुंभार, महेश कोरवी, सचिन सुतार, सुनील सुतार, रमेश सूर्यवंशी, सुनील सदाशिव सुतार, प्रशांत देवरुखकर, चेतन शिंदे , शिवतेज बाजारी, काशिनाथ बिरूनगी, महेंद्र कांबळे, रवि केदार, रत्नाकर लाड, राहुल झिरमिरे, महेश दावणे, अनिल पाटील, सादिया मुजावर, संगीता दिवटे, जैनब शेख, स्वप्नाली कतगर , रश्मी मनुगडे,दिपाली कतगर, संबोधी गायकवाड, संयोगिता महाजन,पूनम पाटील ,स्वाती गावडे ,स्मिता कांबळे, राजश्री संगशेट्टी,श्रुती कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.