Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अगोदर निधी…मग सभा ! महापालिका सभेत नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड!!जिल्हा परिषदेत असमान निधी वाटप, काँग्रेसच्या सदस्यांचे शुक्रवारी लाक्षणिक उपोषण ! विकासकामे रखडली, सदस्यांचे आरोग्य बिघडण्याची वेळ ! !आरोग्य सेवेवर एआयचा वॉच, कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट !आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन ! !केआयटीला आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार कोल्हापुरात सुसज्ज आर्ट गॅलरीची गरज -  मालोजीराजे छत्रपतीविनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जीमवर कारवाई, लॉजिंग व्यवस्थापनला नोटीस...तर गप्प बसणार नाही, कोल्हापुरात काँग्रेसच्या नगरसेवकांचा महायुतीला इशारातेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत राजर्षी शाहू स्पोर्ट्स, ताराराणी विद्यापीठ स्पोर्ट्स विजयी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधीरेडिओलॉजिस्ट डॉ. सुनील कुबेर यांचे निधन

जाहिरात

 

आरोग्य सेवेवर एआयचा वॉच, कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट !आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन ! !

schedule16 Nov 26 person by visibility 82 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी 'महापल्स' या अद्ययावत प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून 'पायलट प्रोजेक्ट' (प्रायोगिक तत्त्वावर) म्हणून करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील एकूण १०४ शासकीय आरोग्य संस्था डिजिटल यंत्रणेशी जोडल्या जाणारया महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र आणि गुणवत्तापूर्ण बदल घडून येईल. या प्रणालीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमधील कामकाजावर थेट लक्ष ठेवता येणार आहे.

रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांची संख्या, औषधांचा साठा आणि डॉक्टरांची उपस्थिती यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यासाठी आता बायोमेट्रिक किंवा फेस रीडिंगचीही गरज राहणार नाही. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केली आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘ ‘येत्या काळात संपूर्ण राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात हा प्रकल्प क्रांतिकारक आणि दिशादर्शक ठरेल.’ उदघाटनप्रसंगी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमिन, आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण सभापती शितल यादव, आयआयटी मंडीचे अधिष्ठाता डॉ. सत्वशील पोवार, हर्षवर्धन काळोखे, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही रुग्णालयात त्रुटी आढळल्यास एआय प्रणालीमार्फत तात्काळ संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना थेट अलर्ट जाईल. या प्रकल्पाचा डॅशबोर्ड आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सभापती आणि पंचायत समितीच्या चेंबरमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे सभागृहात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना जागेवरच अचूक उत्तरे मिळतील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes