Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोलापूरच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदलीशंभर टक्के निधीवर सदस्य ठाम, ५० – ५० चा फॉर्म्युला अमान्य ! अध्यक्ष - सीईओंना गुरुवारी पत्र देणार, पदाधिकाऱ्यांची कोंडी ! ! गांधीनगरातील व्यापाऱ्यावर पाच हजारांचा दंड ; १४४ किलो प्लास्टिकचा साठा जप्तमानवकल्याणाचा भाव जागृतीसाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज - डॉ. भूषण पटवर्धन महसूलमंत्र्यांच्या सोबत क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक !  सातबारा – रेडीरेकनर - प्रॉपर्टी कार्डसंदर्भात सकारात्मक चर्चा ! !कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पलगोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेशसत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनसाहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य

जाहिरात

 

महसूलमंत्र्यांच्या सोबत क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक !  सातबारा – रेडीरेकनर - प्रॉपर्टी कार्डसंदर्भात सकारात्मक चर्चा ! !

schedule29 Jul 26 person by visibility 32 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : क्रीडाई  कोल्हापूरच्या विविध प्रलंबित विषयांवर  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात मुंबई येथे व्यापक बैठक पार पडली. आमदार अमल महाडिक, शााहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत क्रीडाई कोल्हापूरच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. महसूलमंत्री बावनकुळे यांनी या मागण्यांची सकारात्मक दखल घेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड यांना  आवश्यक ती कार्यवाही करून सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना केली. अशी माहिती क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत यांनी दिली.

 बैठकीत खरेदी दस्ताची नोंदणी झाल्यानंतर सातबारा उतारा स्वतंत्र अर्ज, फेरफार नोटीस व अनावश्यक कागदपत्रांशिवाय ऑनलाइन पद्धतीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि सरकारी कार्यालयांतील दिरंगाई कमी होण्यास मदत होईल, असे नमूद करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिकांना भोगवटादार वर्ग-२ मधील जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याबाबतच्या सरकारी निर्णयाचा लाभ देण्याची मागणीही करण्यात आली.
  रेडीरेकनरमधील फुटनोट नुसार अद्ययावत करणे, कन्व्हेयन्स डीड करताना शिल्लक चटई क्षेत्रावरील मुद्रांक शुल्क माफ करणे तसेच कोल्हापूर शहरातील बिगरशेती झालेल्या जमिनीचे ७/१२ बंद करून तातडीने प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.  शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम, महाराष्ट्र क्रिडाईचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, माजी अध्यक्ष महेश यादव, निखिल शहा, संदीप पोवार, विरेंद्र घाटगे, नगरसेवक विजेयंद्र माने आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes