Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोलापूरच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदलीशंभर टक्के निधीवर सदस्य ठाम, ५० – ५० चा फॉर्म्युला अमान्य ! अध्यक्ष - सीईओंना गुरुवारी पत्र देणार, पदाधिकाऱ्यांची कोंडी ! ! गांधीनगरातील व्यापाऱ्यावर पाच हजारांचा दंड ; १४४ किलो प्लास्टिकचा साठा जप्तमानवकल्याणाचा भाव जागृतीसाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज - डॉ. भूषण पटवर्धन महसूलमंत्र्यांच्या सोबत क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक !  सातबारा – रेडीरेकनर - प्रॉपर्टी कार्डसंदर्भात सकारात्मक चर्चा ! !कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पलगोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेशसत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनसाहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य

जाहिरात

 

सत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन

schedule29 Jul 26 person by visibility 38 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी, (दोन ऑगस्ट २०२६ ) कोल्हापुरात ‘अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन’आयोजत केले आहे. दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाध्यक्ष आहेत. शाहीर दिलीप सावंत हे उद्घाटक आहेत. साहित्यिक डॉ. डी. वाय. जमादार हे स्वागताध्यक्ष आहेत. अनिल म्हमाने यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन होणार आहे अशी माहिती निमंत्रक व सत्यशोधक इतिहास परिषदेचे प्रमुख डॉ. कपिल राजहंस, मदन पवार यांनी दिली. या संमेलनात ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जातीअंताचा विचार’या विषयावर परिसंवाद आहे. डॉ. अलोक जत्राटकर हे परिसंवादाचे अध्यक्ष तर डॉ. वैशाली चौगुले, राहुल सडोलीकर हे वक्ते आहेत. या संमेलनात डॉ. भारत पाटणकर व प्रा. किसनराव कुराडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला शंकर पुजारी, सुनील जाधव, अंतिमा कोल्हापूरकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes