Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोलापूरच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदलीशंभर टक्के निधीवर सदस्य ठाम, ५० – ५० चा फॉर्म्युला अमान्य ! अध्यक्ष - सीईओंना गुरुवारी पत्र देणार, पदाधिकाऱ्यांची कोंडी ! ! गांधीनगरातील व्यापाऱ्यावर पाच हजारांचा दंड ; १४४ किलो प्लास्टिकचा साठा जप्तमानवकल्याणाचा भाव जागृतीसाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज - डॉ. भूषण पटवर्धन महसूलमंत्र्यांच्या सोबत क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक !  सातबारा – रेडीरेकनर - प्रॉपर्टी कार्डसंदर्भात सकारात्मक चर्चा ! !कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पलगोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेशसत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनसाहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य

जाहिरात

 

कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पल

schedule29 Jul 26 person by visibility 134 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनींच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणावत यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी कोल्हापुरातील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या या कोर्टात जाणार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार  राणावत यांनी समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे असा आरोप करत त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी ही महिला कार्यकर्त्यांनी केली. त्याचवेळी त्यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी व समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कंगना राणावत यांचा समाचार घेताना हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला. खासदार राणावत यांचा बोलवता धनी वेगळाच आहे. त्यांच्या वक्तव्यामागील दिग्दर्शक आणि पटकथा लेखक वेगळेच आहेत असा टोलाही महिला पदाधिकाऱ्यांनी लगावला.
 कोल्हापुरातील काँग्रेसच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका भारती पोवार, नगरसेविका दिपाली घाटगे, नगरसेविका ऋग्वेदा राहूल माने, नगरसेविका डॉ. सुषमा संतोष जरग, नगरसेविका शुभांगी शशिकांत पाटील, नगरसेविका स्वाती कांबळे, नगरसेविका पुष्पा नरुटे व नगरसेविका अरुणा विशाल गवळी यांनी पत्रकार परिषद घेत महिला खासदार राणावत यांचा चांगलाच समाचार घेतला.
 दिल्ली येथील आंदोलनादरम्यान  विद्यार्थ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात आवाज उठविला होता, शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारले होते. नीट पेपर फुटी प्रकरणी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तरुणाईला हवा होता. यासाठी लोकशाही मार्गाने ते आंदोलन करत होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या लाठीमार केला. खासदार  राणावत यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. मात्र त्यांनी लक्षात ठेवावे लढाई अजून संपलेले नाही, भाजप सरकारला जनता पळती भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. कंगना राणावत यांनी जे अपशब्द वापरले आहेत त्यांच्या विरोधात कोर्टात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तसेच त्यांचे खासदारकीचे पदे रद्द झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे असे काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes