Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महाडिकांकडून नविद मुश्रीफांचे अभिनंदन, विरोधकांवर निशाणा !अध्यक्ष महायुती की महाविकासचा ? नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळात हम सब एक है, सहकार हा आमचा धर्म !कोल्हापूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक, रेल्वे प्रकल्पासह सर्किट बेंचसंबंधी चर्चा!गोकुळच्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ ! निवडीनंतर म्हणाले गोकुळची गाडी वापरणार नाहीजागा उपलब्ध झाल्यास कोल्हापुरात ३५० खाटांचे सेवा रुग्णालय उभारू-प्रकाश आबिटकरअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमग्रामपंचायत हे लोकशाहीतील पवित्र मंदिर, वळसंगला निधीची कमतरता पडणार नाही-आमदार गोपीचंद पडळकर गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून नवा ट्विस्ट, नेत्यांची अडीच तास खलबते ! नावाचा सस्पेन्स कायम!!मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्वेक्षणाला केंद्राची मान्यता ऑनलाइन फसवणूक, कोल्हापुरातील प्राध्यापिकेकडून साडेतीन कोटी उकळले

जाहिरात

 

मराठा महासंघातर्फे शिवराज्यभिषेकदिनानिमित्त विविध कार्यक्रम

schedule29 May 25 person by visibility 35 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे विविध ३१ मे ते सहा जून २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.अशी माहिती महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली. सहा जून हा शिवराज्याभिषेक दिन आहे.

३१ मे रोजी सकाळी ११ वाजता फेटा बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम आहे. एक जून ते तीन जून या कालावधीत राजर्षी शाहू स्मारक भवन येथे महाराणी ताराबाई यांच्या इतिहासावर आधारित  प्रदर्शन व रांगोळी साकारण्यात येणार आहे. दोन जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता इतिहास संशोधक  डॉ. जयसिंगराव पवार यांचे ‘स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराबाईंची शौर्यगाथा’ या विषयावर व्याख्यान आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचे तीन जून रोजी ‘महाराणी ताराबाईंसमोर दिल्ली दीनवाणी’या विषयी व्याख्यान आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाच जून रोजी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत रथ, मर्दानी खेळ, मुली व महिलांचे लेझीम पथक, झांजपथक, प्रबोधनात्मक फलक, वारकरी संप्रदाय, धनगरी ढोलचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले, बबन रानगे, कादर मलबारी, उदय देसाई, संजय पोवार वाईकर, अशोक माळी, शंकराव शेळके, प्रकाश पाटील, विजय पाटील, संयोगिता देसाई आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes