Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघारचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयीगल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !सांगलीत भाजप चितपट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदी महाविकास आघाडी विजयी !सीईओची ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदीगोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूदजुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागत

जाहिरात

 

जरगनगर विद्यामंदिर बनली हायटेक शाळा, अत्याधुनिक लॅबची राज्यात महापालिकेची पहिलीच शाळा

schedule17 Mar 26 person by visibility 221 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची नावाजलेली शाळा, सर्वाधिक पटसंख्या  म्हणून लौकिक असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदीर ही शाळा आता  अत्याधुनिक लॅब असणारी कोल्हापूर शहरातील पहिलीच शाळा ठरली आहे
            
शालेय शिक्षण क्रीडा विभाग, प्राथमिक शिक्षण संचालनालयच्यावतीने शालेय गुणवत्तेच्या आधारावर शाळेस या आयडियल सेंटरचे मानांकन मिळाले. आता  अत्याधुनिक लॅब विद्यार्थ्यांना महत्वाच्या संकल्पना सहज मूर्त स्वरुपात समजावून सांगण्यासाठी या लॅबचा वापर होणार आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्ड, स्टुडन्ट -पोडियम ,टीचर्स -पोडियम, डीएलपी अंतर्गत सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम आयडियल सेंटरमध्ये उपलब्ध आहे
       
या Futuristic classroom मध्ये विद्यार्थ्यांसाठी एकूण २४ स्वतंत्र हायटेक टचस्क्रीन प्लॅटफॉर्म आणि शिक्षकांसाठी स्वतंत्र कंट्रोलिंग टचस्क्रीन प्लॅटफॉर्म सहित इंटरऍक्टिव्ह बोर्ड , उपलब्ध करून दिले आहेत. एकूणच हायटेक बैठक व्यवस्थेसह विद्यार्थी आता हायटेक लर्निंग करणार आहेत. याद्वारे विद्यार्थी कोणत्याही असाइनमेंट किंवा पेपर देखील सहज सोडवू शकणार आहेत.   या नवीन तंत्रज्ञानाचा विद्यार्थांना गुणवत्ता वाढीसाठी फायदा तर होणारच आहे. पण या तंत्रज्ञानाच्या युगात नक्कीच आमचा विद्यार्थी गरुडझेप घेणार आहे.
 उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सुषमा जरग, नगरसेवक दुर्वास बापू कदम, विजयसिंह खाडे पाटील, ॲड.मानसी लोळगे यांनी विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक लॅबच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या.     याप्रसंगी संतोष जरग, प्रशांत जरग,वैभवी जरग, अर्जुन जरग, सतीश लोळगे, विमल गवळी, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे ,विजय माळी ,चंद्रकांत कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका  नीता ठोंबरे, उपमुख्याध्यापक शिवाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर पिंपळकर सुभाष मराठे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन दत्तात्रय पाटील ,योगेश व्हटकर ,वैशाली शेलार यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes