Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये महायुतीचा दोन हजाराहून अधिक मतांनी विजय, ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवावी - हसन मुश्रीफश्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन‘टाइम टू मार्केट’ साधणाराच खरा उद्योजक, ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठी संधी : कुलगुरू डॉ. राजनीश कामतराजू शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक, सतेज पाटलांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये - आमदार राजेश क्षीरसागरमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे धरणे आंदोलनजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीरशक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी -राजेश क्षीरसागर समर्थक भिडले रस्त्यावरविज्ञानाच्या जगाची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती, शहीद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची रिसर्च सेंटरला भेटशिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्याकडून सात प्रकरणात कर्तव्यात कसूर, पदस्थापनेत प्रशासकीय अनियमितता ! चौकशी अहवालात ठपका ! !शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांना कारणे दाखवा नोटीस, खुलासा करण्यास सात दिवसाचा अवधी

जाहिरात

 

नदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत कोल्हापूर महापालिकेला निधी उपलब्ध करावा -  भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव

schedule03 Sep 26 person by visibility 80 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन :  कोल्हापूर महापालिकेकडून दररोज उपसा होणाऱ्या पाण्यापैकी सुमारे 113.04 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर चार एसटीपी प्रकल्पांद्वारे प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेल्या या सांडपाण्याचा प्रभावीपणे पुनर्वापर करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने 204.63 कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल  तयार केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक निधी राज्य सरकारच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी केली.

या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पर्यावरणमंत्री  पंकजा मुंडे यांना  देण्यात आले. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर झाल्यास शहरातील उपलब्ध जलस्रोतांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, पाण्याचा शाश्वत वापर, पर्यावरण संवर्धन आणि नदी प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास कोल्हापूर शहराच्या जलव्यवस्थापनाला आणि पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने 204.63 कोटी रुपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्तरावर उभारणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागामार्फत दि. 27 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या नदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत  प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी कोल्हापूर शहरातील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली. या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन नामदार पंकजा मुंडे यांनी दिले. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी प्रदेश सचिव महेश जाधव उपस्थित होते.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes