जिपच्या चार अधिकाऱ्यांवर महापालिका निवडणुकीची जबाबदारी
schedule19 Dec 25 person by visibility 128 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या निवडणूक विषयक कामासाठी जिल्हा परिषदेच्या चार अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पाणी पुरवठा व स्वच्छता प्रकल्प संचालक माधुरी परीट व ग्रामपंचायत विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. करवीर पंचायत समितीचे गटविकासस अधिकारी संदीप भंडारे यांची कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. या चार अधिकाऱ्यांची महापालिका निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती केल्याने त्यांच्याकडील पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.