कोल्हापूरच्या चित्रकारांच्या कलाकृतीचे मुंबईत प्रदर्शन
schedule22 Dec 25 person by visibility 52 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील चित्रकार प्रवीण वाघमारे, धीरज हाडोळे, स्वप्नील सांगोले यांच्या चित्राकृतींचे 'चित्तदर्शनी' प्रदर्शन २३ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, ऑडिटोरियम हॉल येथे होत आहे. 'चित्तदर्शनी' हा अनुभव पाहणाऱ्याला गती, स्थैर्य, अंतर्मुख प्रवाह आणि अनुभूतीवर भर देतो. या प्रदर्शनात तीन समकालीन कलाकारांची दृष्टी समोर येते, ज्यांच्या कलाकृती थांबून पाहायला आणि अनुभवायला भाग पाडतात. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट कोल्हापूरचे प्रा प्रवीण वाघमारे यांच्यासाठी चित्रनिर्मिती ही आत घडणाऱ्या जाणिवांचा शांत आविष्कार आहे. रोजच्या जीवनातील साधी दृश्ये, निसर्गातील क्षण आणि समाजातील हालचाली त्यांच्या मनात एक सूक्ष्म तरंग निर्माण करतात. हाच तरंग हळूच रेषा, रंग आणि पोत यांचा आधार घेत कॅनव्हासवर उतरतो. अमूर्त वाटणारी ही चित्रे प्रत्यक्षात वास्तवाशी घट्ट जोडलेली आहेत.