Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कारकरवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्राकाँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलनकोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !

जाहिरात

 

डिबेंचर्सच्या रकमेबाबत दूध संस्थांना अपेक्षित निर्णय होईल – हसन मुश्रीफ

schedule15 Mar 26 person by visibility 135 categoryउद्योग

गोकुळच्या  ६३ वा वर्धापनदिन साजरा, आईस्क्रीम विक्रीचाही शुभारंभ

महाराष्ट्र   न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डिबेंचर्सची रक्कम कपातीवरुन निर्माण झालेल्या वादावर निर्णय घेण्यासाठी गोकुळच्या संचालकांची एक समिती स्थापन केली आहे. अजून अहवाल उपलब्ध व्हायचा आहे. डिबेंचर्सबाबत दूध संस्थांना जे अपेक्षित आहे तसा निर्णय घ्यावा..’अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री व गोकुळचे नेते हसन मुश्रीफ यांनी आश्वस्त केले. गोकुळची वाटचाल दिमाखात सुरू आहे. ठेवी ६०४ कोटीवर पोहोचल्या आहेत. आता २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट आहे.’असे त्यांनी सांगितले.

निमित्त होतं, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभाचे. याप्रसंगी गोकुळतर्फे उत्पादित विविध फ्लेव्हरमधील आईस्क्रीमचा शुभारंभ करण्यात आला. तसेच गोकुळतर्फे आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प आवारात हा कार्यक्रम झाला.

 या कार्यक्रमात सर्वच नेतेमंडळींनी ‘स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांनी मोठया दूरदृष्टीने लावलेल्या गोकुळचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. गोकुळ आज देशातील प्रमुख दूध संघ मानला जातो हे साऱ्यांसाठी अभिमानस्पद आहे.’असे उद्गगार काढले. मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळच्या कामकाजाचा आढावा घेताना संचालक मंडळांना काही सूचना केल्या. ‘दुधाचे बिल महिला दूध उत्पादकांच्या नावावर जमा करण्याचा निर्णय झाला होता. त्या निर्णयाचे काय झाले, अजून अंमलबजावणी दिसत नाही. शिवाय म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळतर्फे पन्नास हजार रुपयेचे अनुदान, जिल्हा बँकेतर्फे दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. बारा हजार म्हैसी खरेदी झाल्या. पण आवश्यक त्या प्रमाणात म्हैस दुधाचा पुरवठा गोकुळकडे का होत नाही. ते दूध गेले कुठे ? सुपरवायझरंनी अधिक अधिक सतर्कपणे काम करावे, ठराव गोळा करायला अजून वेळ आहे’अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांचे कानही टोचले.

मुश्रीफ म्हणाले,‘ गोकुळमध्ये गेल्या पाच वर्षात दूध उत्पादक सभासदांचे हित डोळयासमोर ठेवून कामकाज केले. दूध खरेदी दरात वाढ केली. गोकुळच्या ठेवी वाढल्या. उन्हाळाच्या कालावधीत दुधाची आवक कमी होते. चारा टंचाई उदभवू शकते. या कालावधीत दि न्यू इंडिया इन्शुरन्सच्या सहकार्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी २३६ रुपयांची योजना आणली आहे. या योजनेंतर्गत तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्या दिवशी ५०० रुपयेची भरपाई संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.’ आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुळच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला. स्पर्धेच्या जगातही गोकुळ अव्वलस्थानी आहे हे साऱ्यांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळच्या वर्धापनदिनानिमित्त आईस्क्रीम विक्रीचा शुभारंभ होत आहे, हा दिवस साऱ्यांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे. आगामी काळात गोकुळचे दूध संकलन २५ लाख लिटरपर्यत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच येत्या गुढीपाडवा व रमजान ईदला दूध विक्रीचा नवा रेकॉर्ड गोकुळ निर्माण करेल. दूध उत्पादकांसाठी गोकुळने नेहमीच प्राधान्य दिले. आजच्या समारंभात एकूण तेरा लाख रुपयांची बक्षीसे दूध उत्पादकांना प्रदान केली याचा आनंद आहे.’

कार्यक्रमात गोकुळचे माजी व्यवस्थापक आर. जी. शहा, माजी बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, माजी मार्केटिंग अधिकारी डी. एस. घोरपडे, एस. पी. समुद्रे यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी स्वागत केले. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संचालक अभिजीत तायशेटे, रणजितसिंह पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, अजित नरके, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, बाबासाहेब चौगले, बाळासो खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग विभागप्रमुख हणमंत पाटील आदी उपस्थित होते.

………………

सतेज पाटील गोड बोलतात, मला कठोर भूमिका घ्यावी लागते

मुश्रीफांनी भाषणात ‘काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी प्रचार करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी सांगितल्या. जिल्हा परिषदेत ते विरोधी पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. सतेज पाटील हे गोड बोलतात, सोनं घ्या सोन्यासारखं रहा असं म्हणतात. माञ कामकाज करताना मला कठोर भूमिका घ्यावी लागते. स्पष्ट बोलावे लागते. यामुळे संचालक माझ्यावर खूप नाराज असतील. मात्र संचालक मंडळांनी गेल्या पाच वर्षात साथ दिल्यामुळेच गोकुळच्या प्रगतीचा आलेख उंचावला.’असे नमूद केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes